गोष्ट माझ्या आईची भाग ४६

 *📝गोष्ट माझ्या आईची*

*📝  .*अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल*           

  📔       *भाग - 46*            

*📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*

    8308677799

    8806150248           

    

*माझी आई कर्णबधीर होती.तिला सगळे खुणा करून सांगावे लागत असे.स्कॉटलंड मधील एडीनबर्ग  माझे जन्मगाव.साऊथ शेलोट स्ट्रीटवर आमचे घर होते.माझे बालपण अतिशय कष्टात गेले. लहापणी माझे दोन भाऊ वारले.माझ्या बरोबर घरात खेळायला ,बोलायला कुणी राहिले नाही*.


*आईला बोलता येत नव्हते.मला जसे शक्य होईल तसे तिचे हावभाव मी समजून घेत असे.तिला.मी कामात शक्य तितकी मदत करायचो.तिचे डोळे मला नेहमी काहीतरी सांगत आहे असे मला नेहमी वाटायचे.आपल्या मुलाबरोबर आपल्याला बोलता येत नाही याचे दुःख तिच्या चेहऱ्यावर कायम दिसायचे*.


*आई हावभाव करून बोलत असताना ओठांची हालचाल होत असे.याच हालचालीवरून मला ओठांच्या हालचालींवर आधारित यंत्र बनवण्याची कल्पना सुचली आणि टेलिफोनचा शोध लागला.यामागे खरी प्रेरणा आईच होती*.


*मूकबधिर आईला मी घरात कायम पहात होतो तिच्या मनातील द्वंद्व मला कळत होते.हीच प्रेरणा होती की काय म्हणून मीही मूकबधिर मुलीशी लग्न केले.आई माझ्याशी  इतर मुलांच्या आईसारखी कधी बोलली नाही,पण तिला काय सांगायचे आहे हे मला क्षणात कळायचे*.


*आई बोलली की लेकराभोवती फुलांचा सडा पडतो,आई गप्प असली तरी नभीचे तारांगण अवतरते.आई न बोलणारी असली तरी मुक्या पाखरांसारखी तिलाही लेकराची भाषा समजते*.

Comments

Popular posts from this blog

राज्यातील स्वच्छ सुंदर शाळा धानोरे ,

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग १३४

गोष्ट माझ्या आईची भाग-२०