गोष्ट माझ्या आईची भाग ४४
*📝गोष्ट माझ्या आईची*
*📝 .*सोनू निगम*
📔 *भाग - 44*
*📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*
8308677799
8806150248
*माझ्या आईचे नाव होते शोभा.फरिदाबाद हरियाणा येथे माझा जन्म झाला.माझे वडील आगम निगम गायक होते.आईही गाणी गायची.गायनाला पोषक वातावरण घरातच होते.आईने लहानणापासूनच गाण्याची मला सवय लावली होती*.
*मी दिल्ली येथे शिक्षण घेत असताना महा कंजर नवदी यांसकडून संगीताचे शिक्षण घेतले.यावेळी आईचे सगळ्या बारीक सारीक गोष्टीकडे लक्ष असायचे.तिला काही चुकीचे वाटले की ती ताबडतोब लक्षात आणून द्यायची.मी पुढे तारुण्यात अनेक स्पर्धामध्ये भाग घेऊ लागलो आणि त्या जिंकलोही.माझी चित्रपटात गाणे गायला सुरुवात झाल्यावर आईची शिकवण होती"जे करशील ते अतिउत्तम कर, इतके करूनही काही चूक राहिली तर पुढील वेळी दुरुस्त कर".याच प्रेरणेने मी प्रत्येक वेळी उत्तमातील उत्तम गाणी गात गेलो आणि अनेक पुरस्कार मला मिळाले*.
*गुजराती,तमिळ,मराठी,असामी,ओडिया,नेपाळी,मैथिली अशा अनेक भाषांत मी गाणी गायिली हे आई नसती तर शक्य झाले नसते.माझ्या आवडीला तिने योग्य वेळी योग्य ठिकाणावर पोहचवले म्हणूनच मी आवडीचे स्टेशन गाठू शकलो*.
*पहाटे गाणे म्हणायला उठवणे,मला कंटाळा आला तरी माझी लाडिकपणे समजूत काढून गाण्यासाठी तयार करणे,त्याचबरोबर अभ्यासावरही लक्ष ठेवणे.कुठे गाण्याचा कार्यक्रम असेल तर घसा खराब होवु नये म्हणून काळजी घेणे.हे सगळे करताना तिची कुठेही तक्रार नसे*.
*असे म्हणतात आईला सारे कळते.रानात मोराला आई सापडली नाही तर तो सैरभैर होतो तसेच मुलाचेही आहे,आई घरात बसून असली तरी घर भरल्यासारखे असते*.
Comments
Post a Comment