गोष्ट माझ्या आईची भाग ४२
*📝गोष्ट माझ्या आईची*
*📝 .*लुई ब्रेल*
📔 *भाग - 42*
*📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*
8308677799
8806150248
**माझ्या आईचे नाव होते मोनिक बॅरण.ती शेतकऱ्याची मुलगी होती.लग्नाआधी,आणि नंतरही खूप कष्ट तिने केले.माझा जन्म झाला तो दोन भावंडा नंतर.वडील घोड्यांना पाठीवर खोगीर बनवण्याचे काम करत असे.त्याच छोट्या कारखान्यातील एक अरी माझ्या डोळ्यात घुसली आणि डोळे निकामी झाले.आपला डोळस मुलगा आंधळा होणे हा आई बाबांसाठी खूप मोठा धक्का होता.या कठिण परिस्थितीतही आई डगमगली नाही*.
*तिने मला सामान्य मुलांसारखे वाढवले.माझ्यावर भरभरून प्रेम केले.तुला दिसत नसले तरी तू माझ्यासाठी जगातील माझा सर्वात सुंदर मुलगा आहे अशी ती कायम म्हणायची.तुझ्या सुंदरतेपेक्षा जगात काहीच सुंदर नाही असे ती म्हटली की मला आकाश दोन बोटे उरायचे*.
*डोळे गेल्यावर माझा आत्मिश्वास कधी कमी होणार नाही याची तिने कायम काळजी घेतली.माझी संगीताची आवड पाहून पियानो, सेल्लो ही वाद्य शिकण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या आईने मला सगळ्यात लहान वयात अंधाच्या शाळेत घातले. कष्टकरी शेतकरी कुटुंब असतानाही तिने मुलांसाठी तिला जितके करता येईल तितके केले.तिचा स्वभाव कमालीचा शांत होता.ती क्वचितच आमच्यावर रागवत असे.नाहीतर प्रेम तिच्या ठायी ओतप्रोत भरलेले होते.तिच्या इतरांना कायम मदत करावी या संस्कारामुळे मी पुढे सहा टिंबाची अंधांना वरदान लाभलेली ब्रेल लिपी बनवू शकलो*.
*आई जगात एकमेव व्यक्ती अशी असते जी स्वतःच्या मुलांना सुख मिळावे म्हणून स्वतः दुःखाच्या ओलाव्यावर झोपते आणि मुलांना सुखाचे कोरडे अंथरूण देते. तिचा संसारातील ना कधी उकार चुकतो,ना कधी वेलांटी चुकते*
Comments
Post a Comment