गोष्ट माझ्या आईची भाग ४३
*📝गोष्ट माझ्या आईची*
*📝 .*माधुरी दिक्षित अभिनेत्री*
📔 *भाग - 43*
*📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*
8308677799
8806150248
*माझ्या आईचे नाव स्नेहलता दिक्षित.आम्ही तीन भावंडे एक भाऊ आणि तीन बहिणी.माझी लहानणापासूनच असणारी नृत्याची आवड पाहून वयाच्या तिसऱ्या वर्षापासून आईने मला कथ्थक नृत्य शिकवायला सुरुवात केली.मी पुढे त्यात इतकी पारंगत झाले की मला नृत्य स्पर्धेचे अनेक पुरस्कार मिळाले.काही दिवसातच मी व्यवसायिक नृत्यांगना बनले. मेक्रोबायोलॉजी मध्ये मी बी. एस्सी झाले.मी आईला नेहमी सांगत असे मला डॉक्टर बनायचे आहे.पण घडले सगळे उलटे घरात कुणीच अभिनय क्षेत्रात नसतानाही मी यात यशस्वी अभिनेत्री झाले.यात आईचा वाटा मोठा आहे मी चांगले शिक्षण घेतलेले असतानाही तिने मला अभिनय करण्यापासून रोखले नाही.तू केवळ नोकरी कर असा सल्ला दिला नाही*
*हिंदी चित्रपट सृष्टीत माझ्याकडील सौंदर्य,नृत्य,अभिनय या जोरावर मी प्रभुत्व संपादन केले.मी अशी अभिनेत्री होते की अभिनेत्या पेक्षा अधिक मानधन घेत असे.आईला याचा कायम अभिमान वाटतो.तिचे मराठी भाषेवर प्रचंड प्रेम आहे तिच्या या प्रेमापोटी मी काही मराठी चित्रपटातही काम केले आहे.देवदास चित्रपटात मी 'मार डाला' या गाण्यात तीस किलो वजनाचा ड्रेस अंगावर परिधान करून नाचले.हे करताना मला आईचे लहानपणीचे शब्द आठवले की नृत्य कितीही कठीण असले तरी ते आतून आले पाहिजे,मग ते अतिउत्तम होते.एक सामान्य कुटुंबात जन्म होवूनही मी ख्यातनाम अभिनेत्री झाले यात 'सब कुछ आई 'असेच म्हणावे वाटते.*
*मुलांसाठी सगळे करताना आयुष्य संपत आले तरी शांत समाधानी असते ती आई.हजारो वर्ष उलटली पण आईच्या पदराचा काठ बदलला नाही,तो तसाच आहे काहीसा हळवा,प्रेमळ,करुण,आणि कायम हवा हवासा*
Comments
Post a Comment