गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग ११

 *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या*

*📝*भाग-11*

*📝*श्री.चंद्रकांत बोऱ्हाडे*

    8308677799

    8806150248



*त्याचा जन्म हरियाणा राज्यातील सोनिपत जिल्ह्यातील नाहरी गावात झाला.त्याची घरची परिस्थिती बेताचीच.त्याच्या वडिलांची स्वतःच्या मालकीची जमीन नाही. कुटुंबातील सर्वांचे पोट भरावे म्हणून ते इतरांची जमीन वाट्याने करत.आपल्या मुलाने  कुस्ती खेळात नाव कमवावे ही बापाची इच्छा.   पोराचा कुस्तीचा सराव बुडतो म्हणून  गावापासून 40 किलोमीटरवर स्वतः फळे आणायला  जाणारे वडील त्याला लाभले.याच जिद्दीने त्याने जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्य पदक जिंकले तेव्हा  त्याचे वडील  तो क्षण पहायला नव्हते कारण त्यावेळी ते शेतात काम करत होते.अशा परिस्थितीत तो चिकाटीने कुस्ती शिकत होता. शेवटी तो यशस्वी ठरलाच टोकियो येथील ऑलम्पिक स्पर्धेत 5 ऑगस्ट 2021 रोजी 57 किलो वजनी गटात  सिल्वर पदक जिंकून  देशाची मान त्याने अभिमानाने उंचावेल असे यश मिळवले .शिवाय वडिलांच्या ही कष्टाचे चीज केले.तो महान खेळाडू म्हणजे रवी दहिया उर्फ विजय कुमार*


सन 2015 मध्ये ज्युनियर जागतिक कुस्ती स्पर्धेत सिल्वर पदक,2018 मध्ये जागतिक कुस्ती स्पर्धेत सिल्वर तर 2019 च्या जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्य पदकाचा तो मानकरी ठरला.


*महाबली सतपाल सिंह व वीरेंद्र कुमार हे रवी दहिया चे प्रशिक्षक.फक्त कुस्ती वर लक्ष केंद्रित करणारा हा खेळाडू आज पर्यंत कोणत्याही विवादात नाही .त्याचे गावच  मुळी कुस्तीचा वारसा असणारे  गाव.फोगाट भगिनी,योगेश्वर दत्त,बजरंग पुनिया हे सारे मेडल विजेते खेळाडू त्याच्याच गावचे.कुस्तीची पंढरी मानल्या जाणाऱ्या दिल्लीच्या छत्रसाल मैदानावर रवीने अनेक वर्षे कठोर मेहनत केली तेव्हा कुठे तो कारकिर्दीच्या उच्च बिंदूवर पोहोचला.रवीचे यश हेच सांगून जाते कोणत्याही गोष्टीचा ध्यास घ्या,त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत रहा,परिस्थितीतवर स्वार व्हा.मग आयुष्याला यशाची गोडी येतेच येते.*

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

राज्यातील स्वच्छ सुंदर शाळा धानोरे ,

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग १३४

गोष्ट माझ्या आईची भाग-२०