*📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या*

*📝*भाग-8*

*📝*श्री.चंद्रकांत बोऱ्हाडे*

    8308677799

    8806150248



*तीचे वडील रविंद्र नौदलात अधिकारी  तर आई सुनीता उत्तम हॉलीबॉलपटू व क्रिकेटपटू होती.मूळातच  खेळाचा वारसा असणाऱ्या घरात तिचा जन्म 12 सप्टेंबर1980 ला कोल्हापूरात झाला.वडिलांकडे पाहून तिला वर्दीचे प्रचंड आकर्षण होते.या वेडापायी तीने कॉलेजमध्ये एन. सी.सी मध्ये  भाग घेतला.पण घडले भलतेच तिला तिथे नेमबाजीची आवड लागली.मग मात्र तिने नेमबाजी याच खेळाला सर्वस्व दिले.अनेक अडचणींवर मात करत ती इतकी यशस्वी झाली की जागतिक नेमबाजी स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली.अशी अविस्मरणीय कामगिरी करणारी ती मुलगी म्हणजे मराठमोळी तेजस्विनी सावंत*.


  नेमबाजी या खेळात भारतात एका महिला खेळाडूने इतके यश मिळवने हीच महाराष्ट्र राज्यासाठी गौरवाची बाब होती. तेजस्विनी म्हणजे 10 मीटर नेमबाजी प्रकारात कसलेली खेळाडू. तिने दक्षिण आशियाई स्पर्धेत सांघिक सुवर्ण पदक,मेलबर्न येथे दोन सुवर्णपदके,जर्मनी येथे 50 मीटर रायफल प्रकारात 2 सुवर्णपदके तर मिळवलीच. शिवाय राष्ट्रीय स्पर्धेत एकाच वेळी 6 सुवर्णपदके मिळवून नवा   राष्ट्रीय विक्रम स्वतःच्या नावे केला.

तिच्या या अतुलनीय कार्याची दखल घेत तिला अर्जुन पुरस्कार, ताराराणी पुरस्कार, लोकमत पुरस्कार यांनी सन्मानित करण्यात आले आहे.


*नेमबाजी सारख्या प्रचंड महागड्या  खेळात  पैसे कमी पडतात म्हणून खेळ थांबवून खाजगी नोकरी करून कुटूंबावरील ओझे कमी करावे असेही तिला वाटले.पण  वारणा समूह मदतीला धावून आला , तिला या समूहाने  दत्तक घेतले . ती पुन्हा उभी राहिली  आणि सोनेरी यश मिळवत गेली.जागतिक नेमबाजी स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकत जगाला भारतीय नेमबाजीची दखल तिने घ्यायला लावली.यश म्हणजे तरी काय स्वतःतील सर्वोत्तम शोधत जाणे.जगापासून जरासे वेगळे काहीतरी करणे.आपल्या नष्ट होत जाणाऱ्या इच्छेला एकाग्र करणे.तेजस्विनी ने तेच केले म्हणूनच ती महाराष्ट्राची मराठमोळी कर्तबगार तपस्विनी  ठरली.*

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

राज्यातील स्वच्छ सुंदर शाळा धानोरे ,

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग १३४

गोष्ट माझ्या आईची भाग-२०