गोष्ट माझ्या आईची भाग-१४

 *📝गोष्ट माझ्या आईची*

*📝नील आर्मस्ट्राँग-चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला माणूस .*            

  📔       *भाग - १४*            

*📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*

    8308677799

    8806150248           

    

*माझा जन्म झाला तो अमेरिकेतल्या एका छोट्याशा गावात. जेव्हा मी शाळेत जायला लागलो तेव्हा माझी आई मला अनेक गोष्टी समजावून सांगायची.ती म्हणायची"आयुष्यात तू असं एखादं स्वप्न उराशी बाळगल पाहिजे की जे तुला संपूर्ण आयुष्यभर जगण्याची प्रेरणा देईल त्याला दिशा देईल.तुला महत्त्वकांक्षी आणि उच्च ध्येयवादी बनवेल.स्वप्न नुसतं बघण्यासाठी नसतं,तर तन मन झोकून देवून खूप कष्ट करून ते साकारायचे असते."तिच्या शब्दांचा माझ्या मनावर मोठा परिणाम झाला*.


*लहानपणी मला विमानाचे वेड होते.आपण वैमानिक व्हावे.आकाशात भरारी मारावी असे वाटत असे.फ्लाईंग क्लब मध्ये विमानाचे टायर पुसण्यापासून धावपट्टी स्वच्छ करण्यापर्यंत पडेल ते काम केले.या पैशातून मी हौशी पायलट होण्याचे प्रशिक्षण पूर्ण केले.कमी वयात मी विमानाचा पायलट झालो.गंमत म्हणजे माझ्याकडे त्यावेळी दुचाकी चालवण्याचे लायसन्स नव्हते पण विमान चालवण्याचा परवाना होता.आई वडिलांना खूप कौतुक वाटले*.


*मी मनापासून अभ्यास करत राहिलो म्हणून मला एव्हिएशन इंजिनिअर होता आले.अमेरिकन नौदलात प्रवेश करून वेगवेगळी विमाने चालवली.२००प्रकारची विमाने चालवण्याचा अनुभव माझ्याकडे होता म्हणून नासाने चांद्रमोहिमेसाठी माझी निवड केली होती.हे मला व आईला कळाले तेव्हा माझा आनंद गगनात मावत नव्हता.माझ्या आईला या सगळ्या कामगिरीचे श्रेय होते.कारण तिनेच संस्कार केले होते की तुम्ही एका स्वप्नाच्या पूर्ततेसाठी स्वतःला झोकून द्या मगच तुम्ही यशस्वी होता*.  


*नील इतका मोठा झाला तो आईच्या उत्तम संस्काराने आणि त्यागाने शेवटी काय तर आई आणि माती दोघीही धरून आहेत अजून जमीन म्हणून आपली किंमत लाखमोलाची आहे.ती मुळे एकदा का सहज हातात यायला लागली की आपली किंमत कवडीमोल हेच ते सत्य*.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

राज्यातील स्वच्छ सुंदर शाळा धानोरे ,

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग १३४

गोष्ट माझ्या आईची भाग-२०