गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग ८५
*📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या*
*📝*भाग -85-*
*📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*
8308677799
8806150248
*तिचा जन्म मुंबई येथे 1 डिसेंबर 1954 मध्ये झाला.वडील वसंत खानोलकर सामाजिक व राजकीय दृष्ट्या जागरूक होते.भारतीय स्वातंत्र्य संग्रामात त्यांचा सहभाग होता.तर तिची इंदुमती आई महिलांच्या अडचणी सोडवणाऱ्या सामाजिक संस्थेला जोडलेल्या होत्या.समाजसेवेचा वारसा तिला जन्मजात मिळाला होता.कुठलाही अन्याय होत असेल तर सहन करायचा नाही हेच ती लहानपणापासून शिकत आली.पुढे ती मुलगी टाटा सामाजिक शास्र संस्थेतून एम.ए ची पदवी मिळवते.याच शिक्षण संस्थेत काही दिवस शिक्षिका म्हणून काम करते.सात वर्षे मुंबईमध्ये विविध स्वयंसेवी संस्थेत काम करते.हे करताना ती नर्मदा बचाव आंदोलनाचे असे काही नेतृत्व करते की सरकारला तिच्या आंदोलनाची दखल घ्यावी लागते.देशभर हे आंदोलन प्रचंड गाजते.असे अनेक वर्षे समाजकार्य करून अनेकांचे संसार सुखाचे करणारी ती मुलगी म्हणजे सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर*.
त्यांनी समाजासाठी अख्खे आयुष्य पणाला लावले.त्यांच्या याच कार्याचा गौरव म्हणून त्यांना मातोश्री रमाबाई आंबेडकर, महात्मा फुले, दिनानाथ मंगेशकर,मानवी हक्क रक्षक यासारखे अनेक मानाचे पुरस्कार प्रदान करण्यात आले. प्रति नोबेल पारितोषिक ज्याला म्हटले जाते असा स्वीडन सरकारचा राईट लाईव्ह लिहूज अवार्ड मेधा ताई यांना देण्यात आला.मेधाताई 35 वर्षांपासून नर्मदा बचाव आंदोलनातर्गत नर्मदा नदीवरील सरदार सरोवर धरणामुळे स्थलांतरित झालेल्या लोकांच्या हक्कासाठी लढत आहेत.नर्मदा खोऱ्यातील आदिवासी,शेतकरी,मजूर,मासे कामगार यांच्या न्याय हक्कांसाठी मेधाताई आजही लढत आहे.
*2005 साली मुंबई मधील झोपडपट्टी पुनर्वसन मध्ये बिल्डर लोकांनी या लोकांना फसवले या विरोधात त्यांनी केलेले घर बचाओ घर बनावो हे आंदोलन प्रचंड यशस्वी झाले.नॅशनल अलायन्स ऑफ पीपल्स मूव्हमेंट ही त्यांनी स्थापन केलेली संस्था शांती,न्याय, यांची दडपशाही करणाऱ्या विरोधात काम करते.मेधाताई या ज्या समाजाला कुणीच आधार नाही अशा वंचित,विस्थापित, गरीब समाजासाठी आतापर्यंत लढत, झगडत आल्या आहेत.त्यांचे रहाणे जसे अगदी साधे आहे तसे त्यांचे आयुष्यही प्रेरणादायी आहे.त्यांच्या जीवनाकडे पाहताना आपल्याला हीच शिकवण मिळते तुमच्यात अन्यायाविरुद्ध लोक एकत्र आणण्याची क्षमता असेल तर नक्की लाखो लोकांचे नेतृत्व करा.ते लोकच तुम्ही काही न करता तुम्हाला उच्च शिखरावर पोहचवतील*.

7uiiuhhjjjj
ReplyDelete