गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग - ४६

 *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या*

*📝*भाग46-*

*📝*श्री.चंद्रकांत बोऱ्हाडे*

    8308677799

    8806150248



*कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले मधील कुंभोज येथे त्याचा जन्म 22 सप्टेंबर 1887 मध्ये झाला.त्याची आई गंगाबाईने त्याग आणि साधुत्वाचे संस्कार त्याच्यावर लहान पणापासूनच केले होते. लहानपणापासून त्याच्या पित्याला त्याने खुप शिकावे,पदवी मिळवावीअसे वाटत असे,पण सहावी नंतर त्याचे शिक्षण थांबते.तरी बहुजन समाजाच्या उद्धाराची तळमळ त्याला स्वस्त बसू देत नाही. तो साताऱ्याला जाऊन मुलांना मोफत शिकवण्या देऊ लागतो.तळागाळातील मुलांनी शिकावे म्हणून तो मुलगा विजयादशमीच्या मुहूर्तावर 4 ऑक्टोबर 1919 मध्ये साताऱ्यातील काले  गावातएक शैक्षणिक संस्था काढतो.पुढे ती संस्था आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षण संस्था बनते.ती संस्था म्हणजे रयत शिक्षण संस्था. आणि गरिबांच्या लाखो मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आयुष्यभर झटणारा तो मुलगा म्हणजे भाऊराव पायगौंडा पाटील उर्फ कर्मवीर भाऊराव पाटील*.            


**जनसेवेचे फलित म्हणून अण्णा ही उपाधी लोकांनी त्यांना दिली.अण्णांनी केलेल्या या कार्यामुळे भारत सरकारने त्यांना  पदमभूषण पुरस्कार तर,पुणे विद्यापीठाने त्यांचा डी लिट देऊन गौरव केला ,रयत शिक्षण संस्थेला आजवर डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार, दलितमित्र पुरस्कार,गाडगे महाराज पुरस्कार, आदर्श संस्था पुरस्कार यासारखे  अनेक सन्मान प्राप्त झाले आहे.**


ज्याच्या आयुष्याला मर्यादा नाही असा 'वटवृक्ष' हे बोधचिन्ह  असणारी संस्था पुढे वाढत जाऊन 675 हून अनेक शाखांची होते.मुलांची जडणघडण घामातून आणि श्रमातून झाली पाहिजे म्हणून 'कमवा व शिका 'या नवीन संकल्पनेची देणगी अण्णांनी साऱ्या भारताला दिली.स्वतंत्र,समता,स्वावलंबन, स्वाध्याय, ही अण्णांची चतु :सूत्री होती.                                     *


**वसतिगृहातील मुलांना गोडधोड जेवण मिळावे म्हणून कर्मवीरांना मंगळसूत्र मोडायला देणारी लक्ष्मीबाई पाटील सारखी त्यागी पत्नी मिळाली,1,11,111,रुपये संस्थेला पहिली देणगी देणारे नागनाथ अण्णा नायकवडी डॉक्टर मिळाले.अशा अनेकांच्या त्यागातून' रयत शिक्षण संस्था' उभी राहिली.अण्णांच्या डोक्यावर शिरस्राण,पायात पादत्राण नव्हते पण त्यांच्या पहाडी ध्येयात युगयुगाचे ध्येयवादी त्राण ओसंडून वाहत होते.कर्मवीर भाऊरावांचे जीवन आपल्याला हेच सांगते आत्मविश्वास, अतुलनीय धैर्य,यांच्या जोरावर अनंत अडचणींवर मात करता येते.*

Comments

Popular posts from this blog

राज्यातील स्वच्छ सुंदर शाळा धानोरे ,

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग १३४

गोष्ट माझ्या आईची भाग-२०