गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग५४

 *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या*

*📝*भाग54-*

*📝*श्री.चंद्रकांत बोऱ्हाडे*

    8308677799

    8806150248                       *झेकोस्लाव्हिया येथील झेलीन या छोट्या खेड्यात त्याचा जन्म होतो.वडील जोडे बनवायचे काम करत असतात. तोही याच व्यवसायात प्रगती करायचे ठरवतो.मग तो मुलगा त्याचा भाऊ आणि बहीण  एकत्र येऊन वडिलोपार्जित स्वतःचा जोडे बनवण्याचा व्यवसाय कंपनीच्या रुपात 1894 मध्ये सुरू करतात.हे फार मोठे धाडसी पाऊल असते.सुरवातीला कंपनीत 10 कामगारांची भरती होते.लेदरचे जोडे बनवण्यासाठी खुप खर्च येत असल्यामुळे कंपनी स्थापन झाल्यावर दुसऱ्याच वर्षी कंपनीला प्रचंड तोटा सहन करावा लागतो.यावर उपाय म्हणून तो मुलगा लेदर ऐवजी कॅनव्हास चे जोडे बनवायला सुरुवात करतो.कमी किंमत आणि वजनाने हलके बूट इतके लोकप्रिय होतात की कंपनीला करोडो रुपये नफा होतो.मग मात्र तो मागे वळून पहात नाही. पुढे त्या कंपनीच्या जगातील 90 देशात 5200 च्या वर शाखा आणि 30 हजार पेक्षा अधिक कर्मचारी होतात. ती यशस्वी कंपनी म्हणजे 'बाटा'आणि इतके मोठे यश मिळवणारा त्या कंपनीचा मालक तो मुलगा म्हणजे 'टॉमस बाटा'*                                 


बाटा यांनी विदेशात जाऊन एका वेळी अनेक बूट कसे बनवले जातात याचे प्रशिक्षण घेऊन ते मायदेशात आले.तेथे आल्यावर त्यांनी BATOVKY नावाचा वजनाने अतिशय हलका,दिसायला सुंदर,कमी किंमतीचा बूट बनवला.हा बूट नोकरदार वर्गात तुफान लोकप्रिय झाला.याची मागणी इतकी होती की कंपनीला त्याचा पुरवठा करण्यासाठी नवीन कामगारांची भरती करावी लागली.पहिल्या महायुद्धात सैन्यासाठी मजबूत असे बूट बाटा कंपनीने अनेक देशांना बनवून दिले.यावेळी कंपनीचा काळ उत्कर्षाचा काळ होता.                                          


*पहिले महायुद्ध संपले आणि आर्थिक मंदी चालू झाली.कंपनीचे मोठे उत्पादन पडून होते खप नव्हता.पण बाटा येथेही खचले नाही.त्यांनी एक धाडसीनिर्णय घेतला जो याअगोदर कुणीही घेतला नव्हता.त्यांनी बाटा कंपनीची सर्व पादत्राणे 50 टक्के सवलतीत देण्याची घोषणा केली.हीही कल्पना तुफान लोकप्रिय झाली.ज्यावेळी मंदीत अनेक कंपन्या बंद पडल्या त्यावेळी बाटा कंपनीला हजारो बूट बनवण्याच्या ऑर्डर येत होत्या.रसायन,टायर,रबर,चामडे यात बाटा आजही आघाडीवर आहे.स्वस्त, चांगला दर्जा,आकर्षक डिझाईन हीच बाटा च्या उत्पादनाची वैशिष्ट्ये आजही टिकून आहे.खुप काळ लोटला असला तरी आजही पायात घालायच्या बाटा कंपनीची पादत्राणे अनेकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.सरासरी 10 लाख लोक बाटा ची उत्पादने जगात खरेदी करतात.कंपनीचे मुख्यालय स्वित्झर्लंड येथे आहे.बाटा यांना अनेक अडचणी आल्या पण ते मागे हटले नाही.पुन्हा नव्याने सुरुवात केली.आपल्या जीवनात अनेक संकटे येतात ती आपल्याला मोठे करण्यासाठीच असतात. कारण आपण त्यातून कसा मार्ग काढतो यावर आपल्या संयमाची परीक्षा ठरत असते*.


Comments

Popular posts from this blog

राज्यातील स्वच्छ सुंदर शाळा धानोरे ,

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग १३४

गोष्ट माझ्या आईची भाग-२०