गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग ५५
*📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या*
*📝*भाग55-*
*📝*श्री.चंद्रकांत बोऱ्हाडे*
8308677799
8806150248
*तिचा जन्म 19 एप्रिल 1892 मध्ये इंदूर येथे झाला.वडील सदाशिव केळकर तर आई उमाबाई.तिच्या वडिलांनी ठरवून त्या काळात विधवा असणाऱ्या उमाबाईशी विवाह केला.त्यांच्या पोटी ही जन्माला आली.विधवा आईची मुलगी म्हणून तिच्या वाट्याला शाळेपासून हेटाळणी आली. पण ती तेथेही खंबीर राहिली.पुण्याच्या हुरूरपागेत जीवनाच्या अनेक गोष्टी शिकली.प्रार्थना समाजामुळे प्रगत विचार तिच्या अंगी भिनत गेले.यातून ती भावनगर येथे गिजुभाई बधेका या प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ माणसाच्या संपर्कात येते.मग ती मागे वळून पहात नाही.ज्या काळात शिक्षण दुर्मिळ असते त्यास काळात ती बालशिक्षण चा मुद्दा मांडते.मुले लहान पणापासूनच शिकत असतात हे सांगताना ठाणे येथील कोसबाड ला हे सिद्ध करून दाखवते.पुढे हीच बालशिक्षण शिक्षण पद्धती साऱ्या देशात स्वीकारली जाते.हे काम करणारी ती मुलगी म्हणजे भारतातील पहिल्या बालशिक्षणतज्ञ ताराबाई मोडक*.
ताराबाई यांनी बालशिक्षणावर केलेले काम भारत सरकारच्या नजरेतून सुटले नाही.या कार्याचा गौरव म्हणून त्यांना1962 साली पदमभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.ताराबाई यांनी विधानसभा सदस्य, पाठयपुस्तक समिती सदस्य, अखिल भारतीय बालशिक्षण विभाग अध्यक्ष,केंद्र राज्य सरकार बालशिक्षण समिती सदस्य यासारखी महत्त्वाची पदे भूषवली.महात्मा गांधी यांनी बुनियादी शिक्षण पद्धतीचा आराखडा बनवण्याचे काम त्यांना दिले होते.
*त्यांनी कोसबाडला सुरू केलेल्या कुरणशाळा, घंटाशाळा,अंगणवाडी,गीता शिक्षण पद्धती,ग्रामीण बालवाडी,ग्रामबाल अध्यापन मंदिर या संकल्पना देशभर स्वीकारल्या गेल्या.1936 साली दादरला पाहिले शिशुविहार सुरू करणाऱ्या ताराबाईंना जसे गुरू म्हणून गिजुभाई बधेका मिळाले तशा अनुताई वाघ यांना ताराबाई गुरू मिळाल्या.कोसबाडला 28 वर्षे शिक्षणावर काम करणाऱ्या ताराबाईंनी बालशिक्षणाला वेगळी दिशा देताना लहान मुलांच्या शिक्षणात त्या काळी संगीत,नृत्य, कला,लोकगीते,अभिजात संगीत,यांचा समावेश केला.नदीची गोष्ट, बालकाचा हट्ट ,बालविकास व शिस्त,बिचारी बालके ही त्यांची पुस्तके खुप लोकप्रिय झाली. ताराबाई यांनी हे काम करताना पावोलीपावली भिडणारी कठीण परिस्थितीत संकट म्हणून न स्वीकारता संधी म्हणून स्वीकारली.यातून निव्वळ मार्गच काढला नाही तर सुंदर संकल्पना घडवल्या.वैयक्तिक आयुष्यातील होरपळीचे प्रतिबिंब कधीच त्यांच्या ना स्वभावात आले ना त्यांच्या व्यक्तिमत्त्वात*.

Comments
Post a Comment