गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग ६७
*📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या*
*📝*भाग -67-*
*📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*
8308677799
8806150248
*त्यांचा जन्म पाकिस्तान देशातील होता .तरी त्यांची कर्मभूमी व मातृभूमी कायम भारत हीच राहिली.1944 साली ते भारतात अमृसरला आले.तेथे सायकलचे स्पेअर पार्ट विकताना अधिक व्यापार वाढवण्याच्या उद्देशाने त्यांनी शहर लुधियाना गाठले.तेथे सायकलचे स्पेसर पार्ट विकताना त्यांनी स्वतःचे हँडल व फोर्क बनवले.यातून गरिबांना परवडेल आणि त्यांचा प्रवास सुखाचा होईल अशी स्वदेशी विना इंधन सायकल बनवण्याचा विचार त्यांच्या डोक्यात आला.1956 साली पंजाब सरकारने त्यांना सायकल बनवण्याचा परवाना दिला.यातून तयार झाली भारतातीलच नाही तर जगातील सर्वात मोठी सायकल कंपनी हिरो .आणि त्याचे मालक होते ब्रजमोहन, ओमप्रकाश, दयानंद,सत्यानंद मुंजाल*.
हिरो सायकल लिमिटेड ही कंपनी सुरू झाल्यावर पहिल्या वर्षी त्या 639 सायकली बनवनारी कंपनी आज दिवसाला अठरा हजार पेक्षा अधिक सायकली बनवते.सुरुवातीला सहा लाख कर्ज घेऊन सुरू झालेला व्यापार 23 हजार कोटींवर पोहचला आहे.8 हजार पेक्षा अधिक कामगार येथे काम करतात. हिरो कंपनी फक्त सायकल उद्योगात नंबर एक राहिली असे नाही तर त्यांनी मोटर सायकल उद्योगात पाऊल टाकले आणि सारे काही बदलून गेले.जपानी कंपनी होंडा सोबत भागीदारी करून1985 ला हिरो होंडा ची पहिली गाडी CD100 बाजारात आली. त्यांच्या स्प्लेनडर या दुचाकीने विक्रीचे सर्व रेकॉर्ड तोडले.आणि जगातील क्रमांक एकची टू व्हीलर कंपनी बनली.कालांतराने होंडा कंपनी हिरो पासून विभक्त झाली.पण हिरो कंपनीची जादू कायम राहिली.जगाच्या बाजारात उडी घेताना मुंजाल बंधूनी ग्राहक हाच कायम केंद्रस्थानी मानला.
*लोकांना जे आवडते ते कमी खर्चात आणि उत्तम दर्जा *असणारे उत्पादन त्यांनी कायम पुरवले.बदलत्या काळानुसार आपल्या मॉडेल नुसार बदल केले *म्हणूनच ते आपले वर्चस्व टिकवू शकले. मुंजाल बंधूनी प्रवासाच्या क्षेत्रात सायकल हे असे माध्यम उपलब्ध करून दिले जे गरिबांना सहज घेता येईल.मुंजाल बंधू यांच्या अथक परिश्रमाचे फळ म्हणून इतक्या करोडो रूपयाचा व्यवसाय उभा राहिला.यातून एकच शिकवण मिळते भागीदारीत उद्योग करताना एकी,एकमेकांवर विश्वास, योग्य कामाची विभागणी,आर्थिक शिस्त यातून उद्योगात तुम्ही नक्की यशस्वी होता*.

Comments
Post a Comment