गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग १३४


*📝गोष्टी जिद्दी माणसांच्या** *पर्व -2*
 *नवीन गोष्टी नवीन व्यक्ती* 
*📝भाग -134-*
*📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे
 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे*
8308677799
8806150249

*त्याचा जन्म कर्नाटक राज्यातील  गोरुर हसन येथे कन्नड कुटुंबात एका छोट्या गावात 13 नोव्हेंबर 19 51 रोजी झाला. त्याचे वडील शाळेत शिक्षक तसेच उत्तम कादंबरीकारही होते. त्याचे बालपण गावातील नैसर्गिक वातावरणात गेले जेथे शेतमजुरी व शेतातील कामांमध्येही त्याचा सहभाग असायचा.इयत्ता पाचवीत असताना त्याला सैनिकी शाळेला प्रवेश मिळतो आणि त्याचे नशीब उघडते.पुढे तो मुलगा नॅशनल डिफेन्स अकॅडमी पुणे येथे निवडला जातो. पुढे तो मुलगा भारतीय सैन्य दलात अधिकारी म्हणून दाखल होतो.सैन्य दलात सेवा करून हा मुलगा वयाच्या 28 व्या वर्षी सैन्य दलातून निवृत्त होतो. काही काळ पोल्ट्री,शेती,हॉटेल स्टॉक असे व्यवसाय करतो. हे सगळे करत असताना त्याच्या डोक्यात एक अफलातून कल्पना येते ती कल्पना म्हणजे सामान्य माणसाला सर्वात स्वस्त दरात विमान प्रवास करता यावा म्हणून स्वतःची विमान कंपनी काढण्याची कल्पना. सुरुवातीला ही कल्पना ऐकून त्याला कोणीही वेड्यात काढले असते परंतु स्वतःच्या पत्नीने,मित्रांनी, घरातील सर्वांनी आयुष्याची सर्व पुंजी त्याला या कामी दिली आणि भारतातील सर्वात स्वस्त विमानसेवा देणारी एअर डेक्कन ही कंपनी 2003 साली स्थापन झाली. भारतातील पहिली कमी खर्चाची विमानसेवा चालू करणारा गरिबांचे विमानात बसण्याचे स्वप्न पूर्ण करणारा तो मुलगा म्हणजे कॅप्टन गोरूर रामास्वामी अय्यंगार गोपीनाथ उर्फ जी.आर.गोपीनाथ*. 

*जी.आर.गोपीनाथ यांच्या कार्यामुळे भारतातील सामान्य लोकांसाठी विमान प्रवास परवडणारा झाला आणि तो लोकांच्या जीवनाचा भाग बनला. 'सपनो की उडान' ही एअर डेक्कनची टॅगलाईन होती. हुबळी ते बंगलोर या ठिकाणी 48 सीट असणारे पहिले विमान एअर डेक्कन चे धावले.सुरुवातीला 2000 असणारी प्रवासी संख्या चार वर्षात 25 हजारापर्यंत गेली. शिवाय एअरक्राफ्ट विमानांची संख्या 45 पर्यंत पोहोचली. यामागे जी.आर.गोपीनाथ यांची प्रचंड मेहनत होती. त्या काळात प्रवाशांसाठी 24 तास हेल्पलाईन्स सुरू करणारी एअर डेक्कन ही भारतातील एकमेव विमान वाहतूक कंपनी होती.सर्वसामान्य लोकांचे स्वस्तात विमानात बसायचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या जीआर गोपीनाथ यांना* *1996 एंटरप्राइझसाठी रोलेक्स पुरस्कार* 
*2005 – राज्योत्सव पुरस्कार ( कर्नाटक )*
*2007 - शेवेलियर दे ला लिजिओन डी'होन्युर ( फ्रान्स )* 
*पर्सनॅलिटी ऑफ द डिकेड अवॉर्ड (केजी फाउंडेशन)*
*सर एम विश्वेश्वरय्या मेमोरियल अवॉर्ड (फेडरेशन ऑफ कर्नाटक चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री)* 
*16 सप्टेंबर 2023 रोजी त्यांना भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी भुवनेश्वर येथील ASBM विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट पदवी प्रदान केली. यासारखे अनेक सन्मान त्यांना मिळाले*. 

*जीआर गोपीनाथ यांनी सामान्य लोकांना अशक्य वाटणारा विमान प्रवास त्यांच्या आवाक्यात आणला यापासूनच प्रेरणा घेऊन त्यांच्या जीवनावर तमिळ भाषेत सुरराई पोत्रू, तर हिंदी भाषेत सरफिरा हे चित्रपट निघाले. हे चित्रपट त्यांच्या सिम्पली फ्लाय डेक्कन ओडिसी या चरित्रावर आधारित आहे. काही आर्थिक अडचणींमुळे त्यांना 2007 साली  एअर डेक्कन कंपनी  किंगफिशरला हस्तांतरित करावी लागली तरी त्यांच्या कमी खर्चाच्या विमानसेवेच्या मॉडेलचे जगभर कौतुक आणि अभ्यास झाला.भारतातील सर्वात स्वस्त विमानसेवा असा एअर डेक्कन चा लौकिक जगभर पसरला.कॅप्टन गोपीनाथ यांनी अवघ्या काही हजारात देवू केलेली विमानसेवा हे त्या काळातील प्रचंड मोठे धाडस होते,आणि त्यांनी ते केले. विमान म्हणजे श्रीमंतांनी बसायची जागा गरिबांना तेथे थारा नाही ही संकल्पना मोडीत काढणारे जी आर गोपीनाथ यांचे आयुष्य आपल्याला हेच सांगते की स्वप्न पाहण्याचे धाडस करा,संधी शोधा, कृती करा,अपयश म्हणजे शेवट नाही अपयश तुम्हाला थांबवू शकत नाही ते फक्त शिकवते.नवीन कल्पनांसाठी नेहमी तयार राहा आणि त्या अमलात आणा यशस्वी झाल्यानंतरही आपल्या मूळ मूल्यांना विसरू नका*.

Comments

Popular posts from this blog

राज्यातील स्वच्छ सुंदर शाळा धानोरे ,

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग १३४

गोष्ट माझ्या आईची भाग-२०