गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग५३
*📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या*
*📝*भाग53-*
*📝*श्री.चंद्रकांत बोऱ्हाडे*
8308677799
8806150248
*पश्चिम बंगाल राज्यातील कोलकाता येथील जोराशंका ठाकूरवाडी येथे त्याचा जन्म 7 मे 1861 मध्ये झाला.वडील देवेंद्रनाथ व आई सरला यांना एकूण 14 अपत्ये झाली. यातील तो तेरावे अपत्य होता.लहानपणापासून त्याला कवितेचा छंद लागला. वयाच्या 8 व्या वर्षी त्याने पहिली कविता लिहीली.पुढे भानूसिंह टोपणनावाने तो लेखन करू लागला.वडिलांबरोबर भारतभ्रमण करताना*
*त्याने अनेक महान व्यक्तीची *आत्मचरित्रे *वाचली.इतिहास,खगोलविज्ञान, *संस्कृत असा चौफर अभ्यास *केला.यातून तो इतका प्रगल्भ *लेखक झाला की त्याने लिहिलेली *गीते दोन देशाची राष्ट्रगीते म्हणून *स्वीकारली जातात.त्याच्या *साहित्याला नोबेल पारितोषिक *मिळते.तो महान कवी म्हणजे रवींद्रनाथ टागोर ऊर्फ गुरूदेव*
गुरुदेव यांनी लिहिलेले 'जण गण मन'हे भारताचे तर 'आमार शोनार' हे बांग्लादेश चे राष्ट्रगीत आहे.दोन राष्ट्रगीतांचे जनकत्व असणारे पृथ्वी वरील एकमेव कवी म्हणजे गुरुदेव.त्यांच्या गीतांजली या साहित्य कृतीला आशिया खंडातील व भारतातील पाहिले *नोबेल* पारितोषिक मिळाले.चित्रकार, नाटककार, कादंबरीकार,कवी,संगीतकार अशा सर्व जागी त्यांनी आपले वेगळेपण सिद्ध केले.चतुरंग,मुक्तधारा,राजा और राणी,चार अध्याय,कबुलीवाला या त्यांच्या काही गाजलेल्या साहित्य कृती.विस्तृत व उच्च दर्जाची साहित्य कृती यासाठी रवींद्रनाथ प्रसिद्ध होते.
*त्यांनी घोकमपट्टीच्या शिक्षणाला पर्याय म्हणून शांतिनिकेतन उभे करताना शील शाळा,बागबगीचा,ग्रंथालय यांची स्थापना केली.संत तुकाराम महाराजांचे साहित्य बंगाली भाषेत जसे त्यांनी अनुवादित केले तसे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर खंडकाव्य ही लिहले.कथा,कादंबऱ्या,लघुकथा,प्रवासवर्णने, नाटके हे सारे साहित्य प्रकार त्यांनी हाताळले. जालियनवाला बाग हत्याकांडा नंतर त्याचा निषेध म्हणून इंग्रज सरकारला'सर' ही पदवी परत केली.कायम निसर्गाच्या सानिध्यात रमणारे गुरुदेव यांच्या जीवनाकडे पाहताना हेच जाणवते की तुम्हाला ज्या गोष्टींत आवड आहे तेच काम करा.आवडीच्या कामात तुम्ही अधिकचे प्रयत्न करून अधिक यशस्वी होता*.

Comments
Post a Comment