गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग ६२

 *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या*

*📝*भाग -62-*

*📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*

    8308677799

    8806150248     



       *महाराष्ट्र राज्यातील मुंबई सारख्या माया नगरीत त्याचा जन्म 1 मे 1955 मध्ये उद्योगपती कुटुंबात  झाला.वडील हरिष तर आई इंदिरा यांचे त्याच्या शिक्षणाकडे जातीने लक्ष होते.तो हॉवर्ड विद्यापीठात पदवी घेतो तर पुढे एम.बी.ए चे शिक्षण पूर्ण करतो.तो मुलगा मग भारतात येतो.स्वतःच्या वडिलोपार्जित व्यवसायात कार्यकारी सहाय्यक बनतो. आपल्या स्वतःच्या वेगळ्या कार्यशैलीने तो त्या व्यवसायाचा प्रमुख बनतो.मग प्रचंड झेप घेत ती कंपनी 15 हजार अरब डॉलर मूल्य असणारी कंपनी बनते.त्यात सोळा हजार पेक्षा अधिक कामगार काम करू लागतात.ती कंपनी म्हणजे महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड आणि हे कंपनी साम्राज्य उभा करणारा तो मुलगा म्हणजे द ग्रेट पर्सन आनंद हरिष महिंद्रा.*    

                    

   पंजाब मधील लुधियाना येथून एक स्टील कंपनी म्हणून जगदीश चंद्र महिंद्रा यांनी सुरू केलेल्या कंपनीचे इतके मोठे जाळे तयार झाले ते आनंद महिंद्रा यांच्या कल्पक बुद्धिमत्तेमुळे. आनंद यांच्या सामाजिक व औद्योगिक  कार्याचा गौरव म्हणून त्यांना पदमविभूषण,फ्रान्सचा ऑर्डर ऑफ मेरिट,राजीव गांधी पुरस्कार,अमेरिकेतील इंडिया फाउंडेशन कडून पर्सन ऑफ इयर व लीडरशीप अवार्ड,आशिया बिझनेस लीडर,इकॉनॉमीक टाईम्स अवार्ड यासारखे अनेक सन्मान मिळाले.जपान क्वालिटी मेडल,डेमिंग अवार्ड जिंकणारी जगातील एकमेव कंपनी म्हणजे महिंद्रा.महिंद्रा ट्रॅक्टर,बोलेरो, कमांडर,मॅक्स,स्कॉर्पिओ, जायलो, रेनॉल्ड लोगान,SUV300,XUV500 ही गाड्यामधील महिंद्रा ची उत्पादने प्रचंड लोकप्रिय झाली.कोटक महिंद्रा बँक,महिंद्रा डिफेन्स, टू व्हीलर लिमिटेड, एज्युकेशन, फायनान्स,या सारख्या अनेक क्षेत्रात महिंद्रा कंपनी यशस्वी ठरली आहे. 


 *कार्यक्षम व्यवस्थापन* *आणि नेतृत्वात जागतिक उद्दिष्टे व यश मिळवण्यासाठी काही निश्चित निकष पूर्ण करणारी महिंद्रा ही मोजक्या कंपन्यांपैकी एक कंपनी आहे.भारतातील अनेक मुली शिकाव्यात,त्यांचे अर्धवट शिक्षण सुटू नये म्हणून आनंद महिंद्रा यांनी नन्ही कली 'नावाने सुरू केलेला उपक्रम NGO आज लाखो मुलींच्या शिक्षणाला दिशा देत आहे.भारतीय लोकांच्या अनेक प्रश्नांशी समरस झालेले महिंद्रा प्रचंड संवेदनशील आहेत.महिंद्रा यांनी आपल्या क्षेत्रात इतके उत्तुंग यश मिळवले तरी या माणसाची संवेदनशीलता आपत्ती काळात पदोपदी जाणवते.आनंद महिंद्रा यांच्या आयुष्याकडून आपल्याला हा धडा मिळतो की तुमच्या पूर्वजांनी तुमच्यासाठी जे वैभव उभे केलेले  आहे ते तुम्हाला टिकवता आले पाहिजे त्यात भर घालता आली पाहिजे.तरच तुम्ही पूर्वजांच्या पुण्याईचे हकदार बनता*.


Comments

Popular posts from this blog

राज्यातील स्वच्छ सुंदर शाळा धानोरे ,

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग १३४

गोष्ट माझ्या आईची भाग-२०