गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग ४८
*📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या*
*📝*भाग48-*
*📝*श्री.चंद्रकांत बोऱ्हाडे*
8308677799
8806150248
**त्याचा जन्म अमेरिकेतील शिकागो मधील इलिनोइस येथे 5 सप्टेंबर 1901 मध्ये झाला.त्याला लहानपणापासून चित्रे काढण्याचे वेड होते.वडील एलिआय व आई फ्लोरा यांच्या बरोबर शेतात काम करताना तो शेतातील जनावरांचे स्केच करत असे.तो मुलगा मोठा झाल्यावर एका वृत्तपत्र माध्यमात व्यंगचित्रकार म्हणून काम करतो. तेथे त्याची चित्रे काढण्याची शैली चांगली नाही म्हणून त्याला कामावरून काढले जाते.त्याला कसे तरी चित्रांचे काम मिळत होते.पण यशस्वी असे काहीच आयुष्यात घडत नव्हते.तरीही तो निराश होत नाही.पुढे तो स्वतःची एक कार्टून कंपनी काढतो. ती जगातील 35 अरब डॉलर मूल्य असणारी कंपनी बनते.ती कार्टून विश्वातील क्रमांक एकची कंपनी म्हणजे 'वॉल्ट डिझ्नी ब्रदर्स 'कंपनी आणि ती स्थापन करणारा तो मुलगा म्हणजे वॉल्ट डिझ्ने*.
वॉल्ट यांनी निर्माण केलेल्या सुमारे 22 चित्रपटांना अकादमी पुरस्कार मिळाले.अनेकदा आपल्या चित्रपटांना ऑस्कर पुरस्कार मिळवणारे वॉल्ट एक महान निर्माते,दिग्दर्शक, पटकथालेखक,रेखाचित्रकार, उद्योजक,समाजसेवक होते.स्वतःच्या स्टुडिओ मध्ये खेळत असणाऱ्या उंदराला कार्टून रुपात सजवून वॉल्ट यांनी 'मिकी माऊस' या कार्टून पात्राला जन्म दिला आणि लोकांना ते इतके आवडले की 100 चित्रपटात हे पात्र वापरले गेले.त्यातून करोडो रुपये वॉल्ट यांना मिळाले.वॉल्ट यांना जणू एका उंदराने करोडपती केले.कार्टून मधील 'मार्टिमर 'हे खलनायक पात्र,डंबो हत्ती,द पुह ही सारी लोकप्रिय पात्रे वॉल्ट यांचीच.
*सर्व पालक आणि मुले यांनी एकत्र येऊन आनंद लुटावा यासाठी' डिझ्ने थीम पार्क 'त्यांनी सुरू केले.ते इतके लोकप्रिय झाले की जागतिक पर्यटन स्थळ बनले. पुढे शांघाय टोकीयो,पॅरिस,हाँगकाँग येथे' थीम पार्क 'उभारले गेले.व्यंगचित्र काढता येत नाही म्हणून कामावरून वॉल्ट यांना कमी केले होते पण ते खचले नाही. त्यांचे निधन कॅन्सर सारख्या असाध्य आजाराने झाले, पण आयुष्याची लढाई लढताना त्यांनी आपल्याला हेच सांगितले अपयशाला कस्पटासमान लेखून नकारात्मकतेचे शिखर प्रचंड मेहनतीने,कठोर परिश्रमाने,चिवट वृत्तीने,सकारात्मक वृत्ती अंगी बाळगून सर करून यशोशिखरावर पोहचता येते*.

Comments
Post a Comment