गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग ४३

 *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या*

*📝*भाग43-*

*📝*श्री.चंद्रकांत बोऱ्हाडे*

    8308677799

    8806150248.                  *डॉक्टर असणाऱ्या आई वडिलांच्या पोटी त्याचा जन्म गिरगाव मुंबई येथे 2मार्च 1957 मध्ये झाला.आई उषा वडिल यशवंत यांची गरीब रुग्णांविषयही आस्था,माया तो लहानपणापासून पहात होता.हे समाजसेवेचे बाळकडू त्याला तिथेच मिळाले होते.वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत तो मुलगा ही शल्यचिकित्सक बनतो. तो मणक्यावरील उपचारात  निष्णात बनतो. त्याच्याकडे भारतातूनच नाही तर परदेशातून लोक मणक्यावरील शस्त्रक्रियेसाठी येतात इतकी त्याची कीर्ती होते. पण मी समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून गडचिरोली सारख्या दुर्गम आदिवासी भागात 5000 च्यावर रुग्णावर उपचार व सुमारे 230 गंभीर मणक्याच्या शस्रक्रिया तो करतो.इतके सारे समाज कार्य प्रसिद्धी ची अपेक्षा न  ठेवता आजही ते कार्य नेटाने करणारा तो मुलगा म्हणजे डॉ शेखर यशवंत भोजराज*.


 लहान मुलांच्या मणक्यावरील आजारावर उपचार करणारे भारतातील पाहिले हॉस्पिटल डॉक्टरांनी बाई रेखाबाई वाडिया हॉस्पिटलमध्ये उभारले.केइम,हिंदुजा यासारख्या नामांकित हॉस्पिटलमध्ये काम करताना करोडो रूपये मिळवता आले असते.पण गडचिरोली सारख्या दुर्गम भागात अवजड कामे,लहान वयात ओझे उचलून पाठीला बाक येणे,रक्तातील कमतरता,ही मोठी समस्या डॉक्टरांच्या लक्षात आली. त्यांनी हीच नस ओळखून गडचिरोली मध्ये इतके मोठे काम उभे केले.


 *मुंबईच्या झोपडपट्टीतील कामगारांनाही त्यांनी असेच उपचार 'मुंबई माता बाल संगोपन' संस्थेच्या टिळक हॉस्पिटलच्या माध्यमातून केले.ज्याचे सचिव डॉक्टर माधव साठे सर आहेत .कुठल्याही प्रसिद्धीच्या मागे न लागता डॉक्टर शेखर भोजराज व त्यांची पत्नी डॉ शिल्पा भोजराज यांनी 1998 साली स्थापन केलेल्या स्वतःच्या स्पाईन  फाउंडेशन च्या माध्यमातून आजवर अनेकांना मणक्यावरील आजारातून बरे केले आणि स्वतःच्या पायावरच नाही तर आयुष्यात चालायला शिकवले*.


 

*डॉक्टरांनी ग्रामीण भागात लक्ष केंद्रित करून 'रुलर स्पाईन केअर सेंटर' च्या माध्यमातून सुरू केलेली मणक्यावरील आजार निदानाची सेंटर महाराष्ट्रभर पसरत आहे.हीच संकल्पना महाराष्ट्र शासनाने 'महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स 'यांच्या मार्फत चालवण्याची शिफारस केली आहे.हे डॉक्टरांच्या मेहनतीचे फळ आहे. ऐंशी च्या दशकात मणक्यावरील उपचारासाठी कोणतीही शस्रक्रिया उपकरणे  नसतानाही ज्या उमेदीने डॉक्टर काम करत होते त्याच उमेदीने आजच्या प्रगत तंत्रज्ञानातही समाजासाठी तितकाच वेळ देत  आहेत.त्यांच्या जीवनातून आपल्याला हाच संदेश मिळतो की तुम्ही तुमच्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी करत असाल तर तुम्हाला शोषित, वंचित,पीडित,दुर्लक्षित समाजाचे आशीर्वाद तर मिळतातच पण येणाऱ्या अनेक पिढ्या तुमची आठवण काढतात*.


Comments

Popular posts from this blog

राज्यातील स्वच्छ सुंदर शाळा धानोरे ,

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग १३४

गोष्ट माझ्या आईची भाग-२०