गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग ५६

 *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या*

*📝*भाग -56-*

*📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*

    8308677799

    8806150248    

                 

   *पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यामध्ये कोडीत खुर्द येथे त्याचा जन्म 13 ऑगस्ट 1898 मध्ये झाला.आई अन्नपूर्णा तर वडील केशवराव यांच्या पोटी जणू रत्नच जन्माला आले होते.सुरवातीला काही दिवस गावात राहून नंतर तो पुणे शहरात येतो .पुणे नरजेत सामावून घेतो.येथे खुप काही जीवन जगणे शिकतो.त्याच्या अंगी असणाऱ्या वक्तृत्व कलेमुळे हजारोंची गर्दी जमू लागते.आपल्या विनोद बुद्धीने लोकांना तो पोट धरून हसायला शिकवतो. लेखक,कवी नाटककार,संपादक,पत्रकार,मराठी हिंदी चित्रपट निर्माता, शिक्षणतज्ज्ञ,, राजकारणी ,वक्ता अशा सगळ्या प्रांतात तो मुलगा आपले निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करतो.त्याच्या चित्रपटाला पहिले राष्ट्रिय सुवर्णकमळ मिळते.या साऱ्या प्रांतात आश्चर्यकारक यश मिळवणारा तो मुलगा म्हणजे  प्रल्हाद केशव अत्रे*                    


आचार्य अत्रे यांना 'विष्णुदास भावे 'हा मानाचा पुरस्कार मिळाला आहे.अत्रे यांच्या नावाने अनेक सांस्कृतिक भवने,नाट्यगृहे,सांस्कृतिक मंडळे, स्मारके तयार झाली.वरळी येथे त्यांचा 34 फुटी पुतळा त्यांच्या कार्याची आठवण रहावी म्हणून उभारला आहे.'अत्रे अत्रे सर्वत्र' 'मी अत्रे बोलतोय'हे कार्यकम आजही तिकीट लावून पाहिले जातात.त्यांनी दिग्दर्शन केलेल्या 'श्यामची आई' चित्रपटाला पहिले राष्ट्रीय 'सुवर्णकमळ'मिळाले.२२पेक्षा अधिक नाटके त्यांनी लिहताना 'कऱ्हेचे पाणी' हे प्रचंड गाजलेले आत्मचरित्र लिहले.'झेंडूची फुले' वाचताना लोक पोट धरून हसले.तो मी नव्हेच,मोरूची मावशी,पराचा कावळा,ही नाटके,तर कावळ्यांची शाळा,कशी आहे गंमत,यासारख्या कथा त्यांनी लिहल्या.रत्नाकर,मनोरमा, इलाखा शिक्षक,ही मासिके,नवयुग साप्ताहिक, आणि मराठा दैनिक त्यांनी सुरू केले.                                     


*अत्रे यांच्या घणाघाती भाषणांचा संयुक्त महाराष्ट्र मिळण्यात मोठा  वाटा आहे. भांबुर्डे गावाचं शिवाजीनगर आणि रे मार्केटचे महात्मा फुले मार्केट असे नामकरण करण्यात त्यांचा पुढाकार होता. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष राहिलेल्या अत्रेच्या नावाने सासवड येथे   दरवर्षी साहित्य संमेलन भरवले जाते.तेथे अत्यंत मानाचा 'आचार्य अत्रे' पुरस्कार निवडलेल्या व्यक्तीला प्रदान करण्यात येतो.18 वर्षे शिक्षक म्हणून काम करणाऱ्या अत्रे यांच्या भाषणांचा जनसामान्यावर प्रचंड पगडा होता.अत्रे आयुष्याबद्दल सांगताना म्हणतात जीवनातील सर्व दुःखे समूळ नाहीशी करणे आपल्या हातात नसते.पण त्या दुःखाना हसण्यावारी घेणे किंवा हसून घालवणे ,जीवनातील आशा, आनंद शाबूत ठेवणे हे मात्र आपल्या हातात नक्कीचअसते*.


Comments

Popular posts from this blog

राज्यातील स्वच्छ सुंदर शाळा धानोरे ,

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग १३४

गोष्ट माझ्या आईची भाग-२०