गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग ५०
*📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या*
*📝*भाग50-*
*📝*श्री.चंद्रकांत बोऱ्हाडे*
8308677799
8806150248
*अमेरिकेतील अटलांटा या गावी त्याचा जन्म 15 जानेवारी 1929मध्ये झाला.त्याचे वडील धर्मोपदेशक होते.लहानपणापासून उत्तम संस्कारात तो वाढलेला होता.तो पदवी पर्यंत चे आपले शिक्षण पूर्ण करतो.एक दिवस मोटेगोमेरी येथे रोझा पार्क्स या नागरी चळवळीतील महिलेला गोऱ्या लोकांनी बसायच्या जागेवरून बस मधून उतरवले जाते.याचा परिणाम म्हणून या शहरात सरकार विरुद्ध प्रचंड निदर्शने होतात.याचे नेतृत्व एका तरुणाकडे जाते.पुढे वर्णभेदविरोधी आंदोलन इतके मोठे होते की त्या तरुणाच्या हाकेवर लाखो लोक एकत्र येऊ लागतात.वर्णभेदविरोधी ही लढाई लढून लोकांना आपले हक्क मिळवून देणारा तो मुलगा म्हणजे मार्टिन ल्युथर किंग*
किंग यांना 'अमेरिकन गांधी 'म्हणून ओळखले जाते.वयाच्या अवघ्या 35 व्या वर्षी त्यांना वर्णभेदीविरोधी लढ्यातील योगदानाबद्दल 'नोबेल पुरस्कार 'देण्यात आला.मॅन ऑफ द इयर हा पुरस्कार तर बोस्टन विद्यापीठाची पी.एच.डी चाही सन्मान त्यांना प्राप्त झाला.1963 साली त्यांनी वॉशिंग्टन येथे अडीच लाख लोकांचा मोर्चा काढला यात त्यांनी वर्णभेद नष्ट व्हावा म्हणून केलेले 'आय हॅव ड्रीम' हे भाषण प्रचंड गाजले.गोऱ्या लोकांनी पूर्वग्रह दूर करून निग्रोंना समानतेने वागवावे हा या भाषणाचा मुख्य गाभा होता.महात्मा गांधी यांना आदर्श मानणारे किंग यांचा इतका मोठा लढा अहिंसेवर उभा होता.
*आपले सारे आयुष्य वर्णभेद विरोधी चळवळीला अर्पण केलेल्या किंग यांनी अनेक पुस्तके लिहिली. अनेक वेळा तुरुंगवास भोगला.अमेरिकन समाजाचा वर्णभेद विरोधी दृष्टीकोन बदलण्यासाठी किंग यांनी सारे आयुष्य खर्ची घातले.महात्मा गांधीजीना आपला आदर्श मानणाऱ्या किंग यांचीही गांधीजी सारखी गोळ्या झाडून वयाच्या अवघ्या 39 व्या वर्षी हत्या करण्यात आली. कायम अहिंसेचा पुरस्कार करणारे किंग यांची हत्या हिंसेच्या मार्गाने झाली हे दुर्दैवच म्हणावे लागेल.किंग याच्या जीवनाकडे पाहताना हेच लक्षात येते की जनतेला फक्त लढणारा नेता हवा असतो.मग जनता जागृत,संघटित होते,आणि अन्यायाविरुद्ध लढून आपला हक्क मिळवतेच मिळवते*

Comments
Post a Comment