गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग - ४७

 *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या*

*📝*भाग47-*

*📝*श्री.चंद्रकांत बोऱ्हाडे*

    8308677799

    8806150248



*तिचा जन्म नागपूर येथे 5 मे 1927 साली घुले कुटूंबात झाला.घरात असणारे चांगले वातावरण तिच्या शिक्षणासाठी पोषक ठरते.तिचे मॅट्रिक पर्यंतचे शिक्षण होते.लहानपणी तल्लख बुद्धिमत्ता,मेहनत आणि शिक्षणाची तिला भारी हौस होती.ती तरुण असताना काव्यात्मक वृत्ती,करुणामय जीवनाचा शोध घेणाऱ्या एका तरुणाशी तिची ओळख होते.ती त्याच्याशी प्रेमविवाह करते.पुढे ती मुलगी त्या तरुणाबरोबर कुष्ठरोग्यांच्या समाजसेवेच्या कार्यात अशी काही साथ देते की त्यांनी केलेले समाजसेवेचे काम एक मैलाचा दगड बनून राहते.कुष्ठधाम सुरू करून साऱ्या समाजाने ज्यांना नाकारले त्यांना माणूस म्हणून जगायला प्रेरणा देणारी ती मुलगी म्हणजे साधना मुरलीधर आमटे*.                       


साधना ताईंनी आनंदवन येथे केलेल्या स्वप्नवत कामाचा गौरव म्हणून त्यांना दलित मित्र,मिलेनियम अवार्ड,फाय फाउंडेशन अवार्ड,ग.दि. माडगूळकर पुरस्कार, मातोश्री पुरस्कार,दिवाळी बेन मेहता पुरस्कार,जीवन गौरव पुरस्कार यारखे पुरस्कार मिळाले. बाबा ऊर्फ मुरलीधर देविदास आमटे यांच्या महान कार्याला साधनाताईंच्या श्रद्धेचे बळ होते.सधन कुटुंबातील जन्म असूनही केरसुणी बनवणे, टोपल्या विणणे,चप्पल शिवणे, सर्वांनी श्रम करून केलेला माल विकणे,ही कामे कोणताही कमीपणा न मानता ताईंनी केली.बाबा आमटेंशी लग्न म्हणजे वादळाशी लग्न हे माहीत असूनही त्यांनी श्रमिक विद्यापीठ, युवशक्तीच्याश्रमछावण्या,भारत जोडो अभियान,बाल तरुची पालखी,गोकुळ प्रकल्प या साऱ्या कार्यात बाबांना नेटाने साथ दिली.कुष्ठरोग्यांच्या सेवेचा बाबांनी निर्णय घेतला तेव्हा मरु तर दोघेही मरू आणि तरू तर इतरांनाही तारू हाच निश्चय साधना ताईंचा होता.                     


*कुष्ठधाम उघडण्याची धडपड, अविरत परिश्रम, हालअपेष्टा,आर्थिक टंचाई,यावर मात करून जसे आनंदवन उभे राहिले तसे ते ताईंच्या आयुष्यात केलेल्या प्रचंड त्यागावर उभे राहिले.आपल्या दोन लहान मुलांना जंगलात वाढवणे जेथे काही सुविधा नाही ही सोपी गोष्ट नव्हती. लग्नानंतर नऊवारी साडीच्या  रेशमी धाग्यापासून आयुष्याची झालेली  सुरुवात जाड्याभरड्या खादीच्या सहावरी पर्यंत आली पण याची ना कधी तक्रार ना खंत.साधनाताईच्या जीवनावर असलेले समिधा हे आत्मचरित्र वाचले की जीवनात सुखाचा त्याग काय असतो हे समजते.साधनाताईंच्या आयुष्याकडे पाहताना निर्व्याज प्रेम,पतिनिष्ठा,ईश्वरनिष्ठा,कमालीची सहनशीलता,कोणत्याही संकटांशी झगडण्याची ताकद ही शक्ती फक्त आणि फक्त स्त्री कडे असते.या जोरावर ती कोणत्याही संकटावर मात करू शकते*

Comments

Popular posts from this blog

राज्यातील स्वच्छ सुंदर शाळा धानोरे ,

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग १३४

गोष्ट माझ्या आईची भाग-२०