गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग३९

 *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या*

*📝*भाग39-*

*📝*श्री.चंद्रकांत बोऱ्हाडे*

    8308677799

    8806150248


*त्याचा जन्म 11 ऑक्टोबर 1942 मध्ये अलाहाबाद येथे झाला.वडील कवी तर आई गृहिणी. त्याची विज्ञान शाखेची पदवी पूर्ण झाल्यावर तो एका जहाज वाहतूक कंपनीत एजंट म्हणून कामाला लागतो.पण लहानपणापासून असलेली अभिनयाची आवड त्याला स्वस्थ बसू देत नव्हती.मग तो मुंबईला येतो.काही दिवस वडापाव,केळी खाऊन दिवस काढतो.त्याला अभिनेताच काय पण दुय्यम कामही कुणी देत नव्हते.तरीही तो मुलगा जिद्द सोडत नाही मिळेल ते काम करत राहतो.पुढे खुप संघर्ष करून तो अभिनय क्षेत्रात इतका मोठा होतो की सारी दुनिया त्याच्या अभिनयाची दिवानी होते.तो सहस्रकातील सर्वोत्तम अभिनेता बनतो.तो मुलगा म्हणजे इतिहासातील सर्वात महान, प्रभावशाली अभिनेता अमिताभ हरीवंशराय बच्चन उर्फ शेहनशहा* . 


शतकातील या सर्वोत्तम अभिनेत्याचा दादासाहेब फाळके, पदमविभूषण,पदमभूषण, पदश्री,फ्रांस सरकारचा सर्वोच्च नाईट ऑफ लेजिऊन ऑफ ऑनर, यांसारखे असंख्य पुरस्कार देऊन सन्मान केलेला आहे.14 फ्लिमफेअर अवार्ड,सुपरस्टार ऑफ मिलेनियम हे सारे पुरस्कार अमिताभ यांच्या अभिनयाची उंची सांगतात.                                     


*अमिताभ यांना साडे सहा फूट उंची, म्हणून अनेक दिग्दर्शकांनी नाकारलेले होते.तुमचा आवाज चांगला नाही म्हणून तुम्ही निवेदक होऊ शकत नाही असे आकाशवाणी ने हिनवले. स्वतःची ABCL कंपनी डब्यात गेली तेव्हा सारे गमावून परत ते उभे राहिले. 75 टक्के यकृत खराब आहे म्हणून 25 टक्के चांगल्या यकृतावर सत्तरीतही त्याच जोशात काम ते करतात.सात हिंदुस्थानी पासून सुरू झालेला प्रवास 180 चित्रपट,कौन बनेगा करोडपती पर्यंत आला.'जंजिर 'हा चित्रपट गाजलाच पण डॉन, हम, आनंद,नमक हराम,दिवार ,शोले मोहबत्ते यांनाही लोकांनी डोक्यावर घेतले.लंडनच्या 'मॅडम तुसॉ वॅक्स' म्युझियमध्ये या महान अभिनेत्याचा मेणाचा पुतळा आहे.अमिताभ यांची ताडमाड उंची व आवाजाला नावे ठेवली गेली.आज त्याच' अँग्री यंग मॅन 'च्या अभिनयाचे व आवाजाचे करोडो लोक दिवाने आहेत. यावरून एकच धडा  घ्यायचा तुमची कमजोरीच तुमची ताकद बनवा.यशाचा मार्ग आपोआप खुला होतो*



Comments

Popular posts from this blog

राज्यातील स्वच्छ सुंदर शाळा धानोरे ,

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग १३४

गोष्ट माझ्या आईची भाग-२०