गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग ६१
*📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या*
*📝*भाग -61-*
*📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*
8308677799
8806150248
*मध्यप्रदेश राज्यातील इंदौर मधील महू येथे त्याचा जन्म14 एप्रिल 1881मध्ये झाला.वडील रामजी तर आई आईचे नाव भीमाबाई.त्याचे मूळ गाव रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड जवळील आंबडवे.त्याचे वडील रामजी हे महू येथील सैनिकी छावणीतुन निवृत्त झाल्यावर त्याचे प्राथमिक शिक्षण दापोली तर माध्यमिक शिक्षण सातारा,मुंबई येथे होते.पुढे तो मुलगा अचाट बुद्धिमतेच्या जोरावर त्या काळातील भारतातील सर्वात उच्चविद्याविभूषित मुलगा बनतो. समाजातील जातीय व्यवस्थेविरुद्ध बंड पुकारतो.लाखोंची गर्दी त्याच्या बौद्ध धर्म स्विकारण्याच्या निर्णयाला साथ देते.पुढे तो मुलगा स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेचा शिल्पकार बनतो .हे महान कार्य करणारा तो मुलगा म्हणजे भारतरत्न डॉ.भीमराव रामजी आंबेडकर*.
डॉ.आंबेडकरांचा भारत देशाच्या जडणघडणीत असणाऱ्या योगदानाबद्दल त्यांचा मरोणोत्तर भारतरत्न हा पुरस्कार देऊन सन्मान केला गेला.कार्ल मार्क्स सोबत चित्र लंडनच्या संग्रहालयात चित्र असणारी एकमेव व्यक्ती म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर. दिवसातून 18 तसा अभ्यास करणाऱ्या बाबासाहेबांनी पी.एच.डी अर्थशास्त्र,डी.एस.सी,एल.एल.डी,डी.लिट,बार.अँट.लॉ,यारख्या 32 पेक्षा अधिक पदव्या मिळवल्या.स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री,मसुदा समितीचे अध्यक्ष असणाऱ्या बाबासाहेबांनी सामाजिक,राजकीय,धार्मिक,शैक्षणिक, आर्थिक,सांस्कृतिक, ऐतिहासिक या साऱ्या क्षेत्रात आपले वेगळेपण सिद्ध केले.स्वतंत्र कामगार पक्ष,भारतीय बौद्ध महासभा,बहिष्कृत हितकारणी सभा यांच्या माध्यमातून सामाजिक व मागासवर्गीय समाजातील निराशा दूर करणारा महामानव म्हणजे डॉ. बाबासाहेब.नागरिकांचे मूलभूत अधिकार,मुळातून अस्पृश्यता दूर करणे,महिलांना मातृत्व रजा,महिला सबलीकरण, महिला बालकल्याण,महिलांना कामाच्या ठिकाणी संरक्षण मिळण्याचा कायदा हे सारे श्रेय बाबासाहेबांचे.
*दलितांच्या हक्कांसाठी काळाराम मंदिर प्रवेश,महाड चवदार तळे सत्याग्रह, दलितांसाठी वेगळा मतदारसंघ,या घटना त्यांच्या कार्याची महती सांगतात.त्यांची जयंती ज्ञान दिन,त्यांच्या शाळेतील प्रवेशाचा 7 नोव्हेंबर दिन विद्यार्थी दिन,1 जानेवारी भारतीय संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.प्रत्येक माणसाला इतिहासाचा भार हा वाहवाच लागतो.कारण तुम्ही आम्ही इतिहाच्या खांद्यावर उभे असतो.समाजीकतेचे चटके अनेक जणांनी अनुभवलेले असतात पण या चटक्यांची वस्तुनिष्ठ जाणीव करून देणारे थोडेच लोक असतात यात डॉ.बाबासाहेब आंबेडकर सर्वोच्च स्थानी आहेत.दादर मधील चैत्यभूमी येथील समाधी स्थळावर नतमस्तक होताना बाबासाहेब जणू हेच सांगत रहातात तुम्ही कोणत्या परिस्थिती जन्माला यावे हे तुमच्या हातात नाही ,पण असलेली परिस्थिती प्रंचड संघर्ष करून,समाजाचा विरोध पत्करून बदलणे मात्र तुमच्या हातात आहे*.

Comments
Post a Comment