गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग ४९

 *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या*

*📝*भाग49-*

*📝*श्री.चंद्रकांत बोऱ्हाडे*

    8308677799

    8806150248                          


*त्याचा जन्म इंग्लड च्या लिंकरशायर  मधील ऊल्सथोर्प या एका छोट्या खेड्यात 25 डिसेंबर 1642 मध्ये झाला.बाळाचे पाय पाळण्यात दिसतात या म्हणीप्रमाणे लहानपणी तो एकलकोंडा होता.तो स्वतःला एका खोलीत कोंडून घेऊन खेळण्यांशी खेळत बसे.परंतू त्याचे खेळ सामान्य मुलांसारखे नसे.सूर्याच्या सावलीवर चालणारे घड्याळ, लहान लहान खेळगाड्या,आणि त्याने तयार केलेली चाकावर चालणारी खेळणी पाहून लोक थक्क होत.हे सगळे करून तो अभ्यासातही हुशार होता.यामुळेच तो केम्ब्रिज मध्ये गणित,विज्ञान शिकतो.पृथ्वीच्या आवरणात वस्तू जशाच्या तशा कशा राहतात?पृथ्वी वरील वस्तू बाहेर कशा फेकल्या जातात?या विचाराने तो मुलगा अस्वस्थ होतो.यामागे काहीतरी कारण असणार याची त्याला खात्री पटते.मग एक दिवस झाडावरून सफरचंद खाली पडते आणि त्याला गुरुत्वाकर्षण सिद्धांत सापडतो.हा सिद्धांत मांडणारा तो मुलगा म्हणजे आयझॅक न्यूटन.*                                    


त्यांच्या या कामाबद्दल त्यांचा'नाइटहूड' हा अत्यंत  मानाचा 'किताब देऊन सन्मान केला.17 व्या शतकातील 'गुरूत्वाकर्षण शोध 'म्हणजे विज्ञानाच्या प्रगतीचे अत्युच्य शिखर होते.याशिवाय गतीच्या तीन नियमांचा शोध, प्रकाश आणि दृकशास्र संशोधन, बायनॉमिल थिअरम, कॅलकूलसच्या शोधाने न्यूटनने सर्व जगाला काही वर्षात आधुनिक काळात आणून उभे केले.                                                  


*गुरुत्वाकर्षण या शोधातून पृथ्वीवरील अनेक शोधांचा जन्म झाला.वस्तूचे वजन,अंतर,गुरुत्वाकर्षण शक्ती या सर्व गोष्टींच्या साह्याने पृथ्वीच्या पोटातील गुरुत्वाकर्षणा वरील सर्व वस्तुंना आपल्याकडे आकर्षित करतेइतकेच नाही तर ग्रहांच्या कक्षाही गुरुत्वाकर्षणावर अवलंबून असतात  हे त्यांनी दाखवून दिले.दुर्बिणीतील रंगीत प्रतिमांचा दोष घालवून त्यांनी आरशापासून  दुर्बीण तयार केली.पुढे हे सारे शोध 'हॅले 'या शास्त्रज्ञाने  पुस्तक रूपाने प्रसिद्ध केले.न्यूटन यांनी इतके सर्व शोध लावले यात छोट्या छोट्या घटनांचा वाटा खुप मोठा आहे. त्यावर त्याने विचार ,मनन,चिंतन केले.मग तो यशस्वी झाला.यावरून आपण हेच शिकायचे संधी कितीही छोटी असली तरी तीचे योग्य वेळी  सोने केले तर तुम्ही कितीही मोठे होऊ शकता*.


Comments

Popular posts from this blog

राज्यातील स्वच्छ सुंदर शाळा धानोरे ,

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग १३४

गोष्ट माझ्या आईची भाग-२०