गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग ६३

 *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या*

*📝*भाग -63-*

*📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*

    8308677799

    8806150248      

               

  *केरळ राज्यातील अलाप्पूझा येथे तिचा जन्म1964 साली झाला.वडील आय.एफ.एस अधिकारी तर आई शिक्षिका.ती थुंबा रॉकेट व मिसाईल लाँचिंग स्टेशनजवळ मोठी होते.यातून तिला लहानपणीच रॉकेट चे आकर्षण असते. घरात सगळे कसे आनंदी वातावरण पण एक दिवस तिच्या वडिलांना पक्षघाताचा झटका येतो सगळे कसे कोलमडून पडते.तिची आई जिद्दीने उभी राहते.हिच्यासह बरोबरीच्या चारही बहिणींना चांगले शिक्षण देते. तिला लहानपणापासून गणित व भौतिकशास्त्र हे विषय प्रचंड आवडत असे.ती मुळातच हुशार असते स्टेट बँक ऑफ इंडिया कडून दरमहा 100 रुपये कर्ज घेऊन ती बी.टेक एम टेक,डिफेन्स ऍडव्हान्स टेकनोलॉजी सारखे उच्च शिक्षण घेते.मग भारताच्या संरक्षण संशोधन व विकास संस्थेत(DRDO )देशसेवा करताना स्वतःच्या कामाचा असा काही अत्युच्य बिंदू गाठते की ती मुलगी भारताची पहिली मिसाईल वूमन म्हणून ओळखली जाते.ती मुलगी म्हणजे महान भारतीय शास्त्रज्ञ टेसी थॉमस*.   

                         

  टेसी यांनी भारतीय विज्ञान व संशोधन क्षेत्रात जे अनमोल संशोधन केले त्याचा गौरव म्हणून त्यांचा लाल बहाद्दूर शास्त्री नेशन अवार्ड,कल्पना चावला,सुमन शर्मा,मिसाईल वैज्ञानिक, इंडियन ऑफ द इयर,वूमन ऑफ द ईअर  यासारखे अनेक पुरस्कार प्रदान करण्यात आले आहे.पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांनी  'भारतीय वैज्ञानिक रत्न'ही उपाधी त्यांना दिली आहे.                          


        *अग्नी 3, अग्नी 4,त्रिशूल,नाग,अग्नी,ब्रम्होस,या मिसाईल निर्मितीत डॉ. अब्दुल कलाम यांच्या बरोबर मोठे संशोधन केले.अग्नी 5  मिसाईलच्या पहिल्या भारतीय महिला संचालक म्हणून संपूर्ण जबाबदारी त्यांनी पार पाडली. 5000 किमीची मारा करण्याची क्षमता असणारे मिसाईल त्यांनी तयार केले.तेव्हापासून त्यांना भारताच्या मिसाईल वूमन म्हटले जाऊ लागले.महिंद्रा ग्रुप चे चेअरमन आनंद महिंद्रा टेसी यांच्या बद्दल असे म्हणतात 'की कोणत्याही भारतीय अभिनेत्री पेक्षा टेसी या अधिक प्रसिद्ध हव्या होत्या.शिवाय  देशातील प्रत्येक शाळेत त्यांचा फोटो हवा यातून हजारो मुलींना प्रेरणा मिळेल.टेसी थॉमस यांनी आपल्या अलौकिक बुद्धिमतेच्या,मेहनतीच्या चिकाटी, व प्रतिभेच्या जोरावर भारत देशासाठी इतके मोठे काम उभे केले त्यांचे जीवन आपल्याला पदोपदी हेच सांगत राहते की आपल्याकडे  असलेल्या बुद्धिमत्तेचा उपयोग दुसऱ्याच्या हितासाठी करा,यातून मिळणारा आंनद व सुख चिरकाल मनशांती देणारे असते*.


Comments

Popular posts from this blog

राज्यातील स्वच्छ सुंदर शाळा धानोरे ,

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग १३४

गोष्ट माझ्या आईची भाग-२०