गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग ५७
*📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या*
*📝*भाग -57-*
*📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे, ता. खेड. जिल्हा पुणे*
8308677799
8806150248 *जुन्या ग्वाल्हेर संस्थानातील म्हणजेच आताच्या मध्यप्रदेश राज्यात त्याचा जन्म ग्वाल्हेर येथे 25 डिसेंबर 1924 मध्ये झाला.वडील कृष्णबिहारी हे प्रसिद्ध कवी आणि प्राथमिक शिक्षक तर आई कृष्णादेवी गृहिणी. लहानपणी कवितेचा व साहित्याचा वारसा त्याला घरातच मिळाला होता.कानपूर विदयापीठातून तो राज्यशास्त्राची पदवी मिळवतो.पुढे भारत छोडो चळवळीत तुरुंगातही जातो.पत्रकार म्हणूनही तो काही काळ काम करतो.त्याच्या कविता रसिकांना मोहिनी घालू लागतात.आपल्या अमोघ वक्तृत्वाच्या जोरावर तो मुलगा राजकारणात स्वतःचा वेगळा ठसा उमटवतो. सुसंस्कृत राजकारणाचा वेगळा वस्तुपाठ घालून देताना तो भारतासारख्या जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाचा तीन वेळा पंतप्रधान होतो.तो कसलेला संसदपटू,कवी मनाचा राष्ट्रनेता,अजातशत्रू नेता बनतो. हे सगळे यश मिळवणारा,लोकतंत्राच्या भाळावर यशाची कहाणी स्वतः लिहीणारा तो मुलगा म्हणजे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी*. वाजपेयी यांना भारतरत्न, पदमविभूषण,लोकमान्य टिळक, डी .लिट यारखे सन्मान मिळाले.चार दशके सक्रिय राजकारणात वावरताना नऊ वेळा लोकसभा,तर दोन वेळा राज्यसभेवर ते निवडून गेले.आपल्या अमोघ वक्तृत्वाने ते सारी संसद मंत्रमुग्ध करत असत .यामुळेच विरोधक आणि सत्ताधारीही त्यांचे चाहते ,मित्र होते.ते पंतप्रधान असताना पोखरण येथील धाडसी अणूचाचणी,कारगील युद्ध,कावेरी जल विवाद,दिल्ली लाहोर सुरू झालेली बससेवा, या सर्व निर्णयात त्यांच्या कणखरतेची,राष्ट्रप्रेमाची,चुणूक दिसून आली.जय जवान,जय किसान,जय विज्ञान ही त्यांची घोषणा भारतीय विज्ञान संशोधनाला प्रेरणा देणारी होती. *अमर आग हैं, अमर बलिदान,मृत्यू या हत्या हे त्यांचे लेखन लोकप्रिय झाले. तर एक बरस बीत गया,झुक नही सकते,कदम मिलाकर चलना होगा, कौरव कौन पांडव कौन,या कविता प्रचंड लोकप्रिय झाल्या.त्यांचा जन्मदिवस 'सुशासन दिवस'म्हणून साजरा केला जातो.माझ्या कवितांमध्ये भीतीचा आवाज नव्हे तर जिंकण्याचा जयघोष असेल असे ते सांगत असे,निगर्वी,शांत,कमालीचा संयम,कुणाशीही कायमचे शत्रुत्व नाही हे सारे त्यांचे गुण आपल्या आयुष्यात घेण्यासारखे.आयुष्यभर अविवाहित असणारे वाजपेयी भारतीय राजकारणातील एक नेता नाहीत तर ते भारताचे असे रत्न आहेत ज्यांच्या अवतीभोवती सुसंस्कृत राजकारणाचा पूर्ण सारीपाट चालत राहतो*.

Comments
Post a Comment