गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग ४१
*📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या*
*📝*भाग41-*
*📝*श्री.चंद्रकांत बोऱ्हाडे*
8308677799
8806150248
*त्याचा जन्म तामिळनाडू राज्यातील चेन्नई शहरापासून 64 किलोमीटर असणाऱ्या तिरुत्तनी या गावात 5सप्टेंबर 1888 मध्ये झाला.त्याची आई होती सितम्मा तर वडील विरस्वामी. घरची परिस्थिती गरीबीची असली तरी,घरात मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष दिले जात असे. तो मुलगा प्रचंड बुद्धिमान होता.या जोरावर तो वेल्लोर ,मद्रास, येथे तत्वज्ञानाचे शिक्षण पूर्ण करतो.संपूर्ण शालेय जीवनात शिष्यवृत्ती मिळवणारा तो मुलगा याच शिक्षणाच्या जोरावर तो इतका मोठा होतो की भारतातच नाही तर ऑक्सफर्ड विद्यापीठात त्याची शिक्षक म्हणून गरज भासते, त्याची शिक्षणावरील अढळ श्रद्धा म्हणून पुढे त्याचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.तो मुलगा म्हणजे महान तत्वज्ञ डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन*
त्यांनी केलेल्या शिक्षण क्षेत्रातील कार्याचा गौरव म्हणून त्यांना भारतरत्न, ब्रिटिश ऑर्डर ऑफ मेरिट,जर्मन शांतता पुरस्कार, मिळाले.इंग्लड सरकारने त्यांना सर ही पदवी दिली.आंध्र व बनारस विद्यापीठाचे ते कुलगुरू राहिले.वर्षातील काही महिने असे 20 वर्ष ऑक्सफर्ड विद्यापीठात त्यांनी भारतीय तत्वज्ञानाचे भाष्यकार म्हणून काम केले.त्यांना भारत देशाचे उपराष्ट्रपती व राष्ट्रपती पद देऊन त्यांच्या बुद्धिमत्तेचा सन्मान केला गेला.
*प्लेटो,कान्ट, प्लॉटीनस,शेक्सपिअर, वोल्ट, गटे, डानटे, होमर यांच्या साहित्य संपदेत आपल्या बुद्धीने ते सहज फिरून आले.शिक्षक ज्ञानाने ,तपाने,चारित्र्याने कायम अग्रभागी हवा असे ते म्हणत.पुस्तके ही माध्यमे आहेत ज्यांच्यामुळे आपण दोन संस्कृतीचा पूल बांधू शकतो असे कायम मानणाऱ्या या तत्वज्ञाने 40 हून अधिक पुस्तके लिहली.चांगल्या शिक्षकाचा सन्मान हा संस्कृतीचा,सत्याचा ज्ञानाचा, सन्मान असतो. समाजाच्या विकासाचा मार्ग हा फक्त शिक्षणाच्या पोटातून जातो हे जाणल्याशिवाय यांत्रिक,तांत्रिक प्रगती होणार नाही असे ते नेहमी म्हणत असे.अशा या महान बुद्धिवादी तत्वज्ञ,शिक्षकाच्या जीवनातून आपण इतकेच शिकायचे शिक्षण हीच शोधांची जननी आहे,आता आपले वय काय आहे,याचा विचार न करता सतत नाविन्याचा ध्यास घेऊन काहीतरी नवीन शिकत रहावे.त्यामुळे तुमच्या मरगळलेल्या आयुष्याला कायमचा जिवंतपणा येईल*.

Comments
Post a Comment