गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग ६०

 *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या*

*📝*भाग -60-*

*📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*

    8308677799

    8806150248                             



*कर्नाटक राज्यातील शिगगाव येथे तिचा जन्म 19 ऑगस्ट 1950मध्ये झाला.वडील रामचंद्र व आई विमल यांची ती लाडाची मुलगी होती.लहानपणापासूनच ती तल्लख बुद्धिमत्तेची व तितकीच चंचल होती.तिची शिक्षणातील गती इतकी होती की 60 च्या दशकात ती सुवर्ण पदक मिळवून इंजिनिअर झाली.या काळात येथे फक्त पुरुषांची मक्ततेदारी होती.पुढे ती संगणक शास्रात एम.ई तर कॉम्प्युटर सायन्स मध्ये एम. टेक करते.टाटा कंपनीच्या स्थापनेपासून कंपनीत काम करणारी पहिली महिला इंजिनिअर ती बनते.पुढे जगातील बलाढ्य  संगणक कंपनी 'इन्फोसिस 'ची ती करोडो रुपयांची  भाग धारक बनते.अफाट समाज कार्य ती करते.हे सारे आगळे वेगळे काम करणारी ती मुलगी म्हणजे सुधा नारायण मूर्ती*       


  सुधा मूर्ती यांनी केलेल्या सामाजिक कामाबद्दल भारत सरकारचा पदमश्री,ओजस्विनी,आर.के.नारायण,राजलक्ष्मी,भारत अस्मिता,बेस्ट टिचर अवार्ड यासारखे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले.सत्यभामा विद्यापीठाने त्यांचा डॉक्टरेट देऊन सन्मान केला आहे.त्या अध्यक्ष असलेल्या इन्फोसिस फाउंडेशन च्या माध्यमातून त्यांनी खुप मोठे काम उभे केले.यात कर्नाटक राज्यातील सर्व शाळांना संगणक व ग्रंथालये,दहा हजार पेक्षा अधिक शौचालयांचे बांधकाम,आपत्तीत नुकसान झालेल्या लोकांना 2500 हजार पेक्षा अधिक घरे त्यांनी बांधून दिली आहे.आपत्तीग्रस्तांना 250 कोटी पेक्षा अधिकची मदत करताना आरोग्य, शिक्षण, महिला सबलीकरण, स्वच्छता, आर्ट कल्चर यावर त्यांनी अभूतपूर्व काम केले.                     


*लेखिका म्हणून त्यांची डॉलर बहु, अस्तित्व,गोष्टी माणसांच्या, स्वर्गाच्या वाटेवर,सामन्यातील असामान्य,थैलीभर गोष्टी ,परीघ,ही पुस्तके प्रचंड गाजली.यातून येणारे उत्पन्न ही त्या समाज कार्यासाठी वापरतात.एक वेळ अशी होती की नारायण मूर्ती आणि सुधा ताई यांना दोन कॉफी मागवून पिणे सुद्धा परवडत नसे.कर्ज काढून सुरू केलेल्या इन्फोसिस  कंपनीच्या भागधारक त्याच सुधा ताईंची संपत्ती काही हजार कोटीच्या घरात आहे.इतक्या श्रीमंत असूनही ना काही दाखवण्याची हौस,ना श्रीमंतीचा डामडौल, मोठेपणाचा भपका नाही.त्या आपल्या लेखनात म्हणतात अंधारात बसण्यापेक्षा एक दिवा कधीही लावलेला बरा.यातून त्यांचे आयुष्य आपल्याला हेच शिकवण देते की तुमच्या कडे असणारे सर्वच तुमचे नाही जे जे तुमच्याजवळ अधिकचे आहे त्यावर ज्यांच्याकडे ते नाही त्यांचा वाटा आहे.तुम्ही त्यातून मदत करत चला त्याचे पुण्य आयुष्यातील कुठल्या ना कुठल्या वळणावर कामी येणार हे नक्की*.


Comments

Popular posts from this blog

राज्यातील स्वच्छ सुंदर शाळा धानोरे ,

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग १३४

गोष्ट माझ्या आईची भाग-२०