गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग ५१
*📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या*
*📝*भाग 51-*
*📝*श्री.चंद्रकांत बोऱ्हाडे*
8308677799
8806150248
*तिचा जन्म पंजाब मधील अमृतसर येथे 9 जून 1949 मध्ये झाला.वडील प्रकाशलाल कापड व्यापारी तर आई प्रेमलता ही गृहिणी. हिच्या सह घरात तीन बहिणी.पण वडिलांनी मुलींना कायम मुलासारखे वाढवले. ती नऊ वर्षाची असल्यापासून टेनिस खेळायला लागली.पुढे टेनिस खेळात भारताचे दोन वेळा प्रतिनिधित्व केले.कॉलेज जीवनात तिचा आदर्श एन .सी.सी.विद्यार्थिनी म्हणून सन्मान झाला.पण तिच्यातील वेगळे काहीतरी करण्याची उर्मी तिला स्वस्थ बसू देत नव्हती.ती त्यासाठी प्रचंड मेहनत घेते राज्यशास्राची प्राध्यापक म्हणून काम करताना खुप अभ्यास करते. आणि ती मुलगी भारतातील पहिली महिला आय .पी .एस .अधिकारी बनते. हे यश मिळवणारी ती मुलगी म्हणजे किरण ब्रिज बेदी*
कर्तव्य कठोर,करारी स्वभाव,कामाप्रती प्रचंड निष्ठा या साऱ्या गुणांमुळे त्यांना रॅमन मॅगसेसे अवार्ड,वुमन ऑफ द इयर,लायन्स क्लब ऑफ द इयर,मदर तेरेसा नॅशनल अवार्ड,पोलीस शौर्य पदक, युनायटेड नेशन मेडल,यासारखे अनेक सन्मान मिळाले.कर्तव्यम,विजयाशांती, आय. पी .एस तेजस्विनी असे चित्रपट त्यांच्या जीवनावर प्रदर्शित झाले.संरक्षण दलात उपकमांडर,दिल्लीच्या आय जी,उपसंचालक यासारखी मोठी पदे त्यांनी भूषवली.तिहार कारागृहात त्यांनी कैद्याच्या जीवनात केलेल्या सुधारणा जगभर अंमलात आणल्या गेल्या.
*आय डिअर,ॲज आय सी,इट्स अल्व्हेज पॉसिबल यासारखी 20 हुन अधिक गाजलेली पुस्तके त्यांनी लिहिली . महिला सुधारणा ,पोलीस सुधारणा,तुरुंगातील सुधारणा,ग्रामीण विकास यावर काम करण्यासाठी त्यांनी नवज्योती व इंडिया फाउंडेशन ची स्थापना केली.मसुरी येथील राष्ट्रीय अकादमी मध्ये पोलीस ट्रेनिंग मध्ये 80 पुरुष तुकडीतील त्या एकमेव महिला होत्या.किरण बेदी यांनी स्वप्न पाहिले त्याचा पाठलाग केला.त्या स्वप्न जगल्या मगच यशस्वी झाल्या.आपण किरण बेदी यांच्या जीवनाकडे पाहताना हाच आदर्श घ्यायचा की ज्यांना जीवनात यशस्वी व्हायचे आहे त्यांच्यासाठी पुरूष वा महिला हा भेद नसतो.यशस्वी होण्यासाठी हवी ती स्वप्नांचा पाठलाग करून त्यांना पूर्ण करण्याची जिद्द व क्षमता*

Comments
Post a Comment