गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग ६४

 *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या*

*📝*भाग -64-*

*📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*

    8308677799

    8806150248                        *अमेरिकेतील हेनरीविलले इंडियाना येथे त्याचा जन्म16 डिसेंबर 1880 मध्ये झाला.वयाच्या पाचव्या वर्षी त्याचे वडिलांचे छत्र हरपते.तो सैरभैर होतो.अकाली जबाबदारीचे ओझे  त्याच्यावर येते.सातव्या वर्षी तो काही स्वयंपाक करायला शिकतो.17 व्या वर्षी हातातील 4 नोकऱ्या जातात.सेल्समन, टायर विकणे,फेरी बोट चालवणे, रेल्वेच्या वाफेच्या इंजिनवर काम करणे अशी कामे तो  उपजीविकेचे साधन म्हणून करू लागतो.अगदी वयाच्या 40 व्या वर्षी कुकिंग चे काम करतो.पुढे वय वाढत जाते हातपाय थकतात.तो उपजीविकेसाठी धडपडत असतो. पण त्याचे मन तरुण असते.त्याला उत्तम चिकन बनवता येत असते.मग त्याच्या मनात विचार चमकतो  तेच चिकन आपण लोकांना विकू शकतो. आणि वयाच्या 62 व्या वर्षी तो स्वतःचे रोडसाइड हॉटेल केंटकी शहरात चालू करतो.त्याच्या चिकनच्या चवीवर लोक फिदा होता.मग तो मागे वळून पहात नाही.त्या हॉटेलच्या जगाच्या 136 देशात 22,621 शाखा होतात.ते प्रसिद्ध हॉटेल म्हणजे Kentacky Fried Chicken म्हणजेच KFC.आणि हे सगळे यश मिळवणारा तो मुलगा म्हणजे कर्नल हरलैड डेव्हिड सैंडर्स*.                                      


चिकन रेसिपीवर सारखे प्रयोग करून कर्नल यांनी स्वतःची एक वेगळी चविष्ट रेसिपी तयार केली.ती घेऊन त्यांनी अनेक गल्ल्या ,हॉटेल पालथी घातली.माझे चिकन चाखून पहा पण सगळीकडे नकार मिळाला.इतके नकार पचवून ते थकले नाही One More Time म्हणत लढत राहिले.शेवटी यश मिळाले पहिला होकार आला. हरमन या हॉटेल व्यसायिकाने त्यांना संधी दिली आणि KFC चिकन चे साम्राज्य उभे राहिले.        आपल्या KFC कंपनीची प्रचंड  लोकप्रियता पाहून त्यांनी तिचे फ्रंचायशी हक्क  2 मिलीयन डॉलर ला विकले.पण शेवटपर्यंत फाउंडर  मेंबर तेच राहतील असा करार  झाला.


**पिझ्झा हट,टॅको बेल,विंग स्ट्रीट, ह्यांची KFC बरोबर भागीदारी आहे.मॅक्डोनाल्ड नंतर जगात दुसऱ्या क्रमांकाची रेस्टॉरंट साखळी KFC ची आहे.कर्नल यांना माझे चिकन जगात सर्वोत्तम आहे हे आणि ते लोकांना खायला घालायचे आहे हा ध्यास होता.तरुण वयात व्यवसायात रिस्क घ्यायला भलेभले लोक तयार होत नाही पण वयाची 62 वर्ष लोटली असताना व्यवसाय सुरू करून इतका यशस्वी करणे साधी गोष्ट नाही.कर्नल यांच्या जीवनाकडे पाहताना हाच संदेश मिळतो की तुम्हाला मोठे होण्यासाठी तुमचे वय आडवे येत नाही.तुमच्यातील सर्वोत्तम काय आहे याचा शोध तुम्हाला एकदा लागला की यश तुमच्या मागे येतेच येते*.


Comments

Popular posts from this blog

राज्यातील स्वच्छ सुंदर शाळा धानोरे ,

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग १३४

गोष्ट माझ्या आईची भाग-२०