गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग ६५
*📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या*
*📝*भाग -65-*
*📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*
8308677799
8806150248
*इंग्लड देशातील वार्वीकशायर मधील स्ट्रटफोर्ड अपॉंन अँव्हन येथे त्याचा जन्म 26 एप्रिल 1564 मध्ये झाला.त्याचे वडील जॉन व्यापारी तर आई मेरी गृहिणी होती.वयाच्या सातव्या वर्षी त्याची शाळा सुरू होते.त्या काळी लॅटिन ही प्रमुख भाषा शिकणे गरजेचे असले तरी तो इंग्रजी फ्रेंच,इटालियन या भाषावर उत्तम प्रभुत्व मिळवतो.वयाच्या 13 व्या वर्षी त्याच्या वडिलांचे निधन होते. इतक्या लहानपणी त्याच्यावर कुटुंबाची व्यवसायाची जबाबदारी येते आणि त्याचे शिक्षण बंद होते.त्याला लहानपणी असणारी नाटकाची आवड जोपासता यावी म्हणून तो गाव सोडून शहरात येतो.तेथे नाटकाचे बारकावे शिकतो.त्यात तो इतकी अच्युत्य दर्जाची नाटके लिहतो की ती नाटके अजरामर होतात हे लेखन करणारा तो मुलगा म्हणजे महान नाटककार म्हणजे शेक्सपिअर उर्फ फादर ऑफ ड्रामा*.
शेक्सपिअर यांची नाटके,काव्ये अजरामर झाली तर शोकांतिका प्रचंड गाजल्या.त्याचा मराठी साहित्यावरही प्रभाव पडला. काव्य प्रकारात सुनीत तर कल्पनारम्य, शोकांतिका, ऐतिहासिक नाटके हे त्यांच्या नाटकाचे मुख्य वैशिष्ट्ये होते.जगातील सर्व भाषांत त्यांचे साहित्य अनुवादित झाले यावरून त्यांच्या लेखणीची ताकद समजते. अ लहर्स कॅम्पप्लेट,द पॅशनेट प्लिग्रीम,ही काव्ये,रोमिओ अँड ज्युलिएट ही कोवळ्या प्रेमाची कहाणी,ज्युलिएअ सीझर,या शोकांतिका, हॅम्लेट,किंग लिअर,मॅकबेथ,ही नाटके अशा साहित्य कृती त्यांच्या प्रचंड गाजल्या.मराठी भाषेतील किंग लिअर वर अनुवादित झालेली *नटसम्राट* ही शोकांतिका अफाट लोकप्रिय झाली.
*आपल्याच माणसांकडून विश्वासघात,दगाफटका,कपट कारस्थाने, सूड,मत्सर, व्यभिचार, राक्षसी वृत्ती,प्रचंड महत्वकांक्षा यांचे विक्राळ दर्शन त्यांच्या नाटकातून जसे घडले तसे मानवी मूल्ये,नियती,ईश्वरी न्याय, मृत्यूचे चिंतन यांचेही दर्शन घडले.चार शतके होत आली तरी शेक्सपिअर तितकाच आजही लोकप्रिय आहे.स्वतःतील उत्तमाचा शोध त्याने घेतला,त्यासाठी एकाग्र राहिला,त्याला काय करायचे आहे हे त्याला पक्के माहीत होते म्हणून तो नाटककार, कवी म्हणून एक दीपस्तंभ बनून राहिला*.

Comments
Post a Comment