गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग ३८


 *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या*

*📝*भाग38-*

*📝*श्री.चंद्रकांत बोऱ्हाडे*

    8308677799

    8806150248


*महाराष्ट्रातील अत्यंत सुगम,संपन्न भाग म्हणजे कोल्हापूर. येथे त्याचा जन्म 19 जुलै 1938 मध्ये झाला.त्याचे वडील विष्णू हे एक प्रसिद्ध गणितीय तज्ञ तर आई सुमती संस्कृत विदुषी होती.परंतू त्याची ओढ विज्ञान विषयाकडे होती.वडिलांना तो सहज कधी कधी म्हणत असे की तुमच्या गणिताचा मी आधार घेईल पण विज्ञान विषयातच नाव मोठे करील.मग तो मुलगा विज्ञान विषयात स्वतःला झोकून देतो.पुढे तो मुलगा बनारस हिंदू विद्यापीठातून बी. एस्सी,केम्ब्रिज मधून बी. ए ,एम.ए, पी. एच .डी पदवी घेतो.आंतरराष्ट्रीय पातळीवर वैज्ञानिक म्हणून तो खुप नाव कमावतो.पण मातृभूमीची आठवण त्याला व्याकूळ करते तो भारतात येतो.पुढे तो मुलगा पुणे येथील 'आयुका' या जगविख्यात संशोधन संस्थेचा संचालक होतो.तो मुलगा म्हणजे महान खगोलशास्त्रज्ञ डॉ.जयंत विष्णु नारळीकर*.                                


डॉक्टरांनी भारतीय विज्ञान क्षेत्रात केलेल्या कार्याची  दखल घेऊन  त्यांना पदमश्री,पदमविभूषण, महाराष्ट्रभूषण,राष्ट्रभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.याशिवाय त्यांना डॉ. शांती स्वरूप भटनागर स्मृती पारितोषिक, बिर्ला सन्मान,फ्रेंच सरकार चा जुल्स जेन्सन,युनोस्कोचे कलिंग पारितोषिक यांसारखे अनेक पुरस्कार  मिळाले आहेत.    

                          

*त्यांचा गुरुत्वाकर्षणवर आधारित हॉईल-नारळीकर सिद्धांत व कृष्ण विवर सिद्धांत खूप गाजला.मुंबई च्या टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या खगोलशास्त्र विभागाचे प्रमुख ते राहिले आहेत.उत्तम साहित्यिक असणाऱ्या नारळीकर यांच्या 'यक्षाची देणगी ' या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे.तर त्यांचे  'चार नगरांतले माझे विश्व'  हे  पुरस्कार प्राप्त आत्मचरित्र खुप गाजले.त्यांनी विज्ञान कथांची अनेक पुस्तके लिहिली.यातून गेली चार दशके ते सामान्य माणसाला खगोलशास्त्र कसे समजेल यासाठी प्रयत्न करत आहे.आपल्या बुद्धीची आणि महानतेची चुणूक दाखवत ते अनेक रहस्य आणि कल्पना उलगडत राहिले.त्यांनी सतत नावीन्याचा शोध घेतला. त्यांचे जीवन आपल्याला हेच सांगते जीवनाकडे प्रचंड सकारात्मक दृष्टिने पहा,संघर्ष करा,जीवनात शिस्त ठेवा मग तुमची यशोगाथा आपोआप लिहली जाते*.

Comments