गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग ६६
*📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या*
*📝*भाग -66-*
*📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*
8308677799
8806150248 *आताच्या पाकिस्तान देशातील पेशावर उत्तर मध्ये त्याचा जन्म 11 डिसेंबर 1922 मध्ये झाला.वडील लाला गुलाम सरवार हे फळांचा धंदा करत होते.पुढे देशाची फाळणी झाली आणि तो वडिलांबरोबर मुंबई या मायनगरीत आला.वडिलांबरोबर फळे विकायचा व्यवसाय करतो.या व्यवसायात तोटा सहन करावा लागतो.पुणे येथे कॅन्टीन मध्ये काम करत असताना देविका राणी त्याला पाहतात.त्याच्यातील अभिनेत्याचे गुण ओळखतात.त्याला चित्रपटात काम करण्याची संधी मिळते.मग मात्र तो मुलगा वळून पहात नाही.सुमारे 5 दशके तो भारतीय चित्रपट सृष्टीवर अधिराज्य गाजवतो तो महान कलाकार म्हणजे मुहम्मद युसूफ खान ऊर्फ दिलीपकुमार*.
दिलीपकुमार यांच्या अभिनयाने फक्त भारतातच नाही तर परदेशातही भुरळ घातली.त्यांच्या या अभिनयाचा सन्मान म्हणून त्यांना पदमभूषण,पदमविभूषण,यासारखे पुरस्कार मिळाले.भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वात मानाचा समजला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन दिलीपकुमार यांना गौरविण्यात आले आहे.शोकांतिका किंवा शोकांतिक भूमिकांमुळे त्यांना ट्रॅजेडी किंग म्हणून ओळखले जाते.
*1944 साली ज्वार भाटा हा त्यांचा पहिला चित्रपट पुढे ,आन,अमर,अंदाज, दाग,देवदास,फुटपाथ,सौदागर, मुगल ए आझम,शक्ती,मशाल,क्रांती,यांसारख्या चित्रपटातून त्यांची जादू कायम राहिली.आपल्या पाच दशकाहूनही अधिक चित्रपट काळात त्यांचे 65 हून अधिक चित्रपट प्रदर्शित झाले.सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा 8 वेळा पुरस्कार मिळवणारे दिलीपकुमार यांनी फळे विकून,कॅन्टीन मध्ये काम करून ,जीवनातील संघर्ष चालू ठेवला. पण ते हरले नाही ,किंवा मागे हटले नाही.त्यांच्या जीवनाकडे पहाताना हेच शिकायचे की परिस्थिती आपल्या अपार मेहनतीने आपल्या समोर गुडघे टेकवून उभी राहते.अशावेळी तुम्ही केलेल्या अतितीव्र संघर्षाचे चीज झालेले असते*.


Comments
Post a Comment