गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग - ४५
*📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या*
*📝*भाग45-*
*📝*श्री.चंद्रकांत बोऱ्हाडे*
8308677799
8806150248 *
*नाशिक जिल्ह्यातील त्रंबकेश्वर येथे त्याचा जन्म 30 एप्रिल 1870 मध्ये झाला.मुंबईमध्ये मराठा हायस्कूल मध्ये त्याचे मॅट्रिक पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले.जे जे स्कूल ऑफ आर्ट शिकून पुढे बडोदा येथे ड्रॉईंग, पेंटींग, मॉडेलिंग, आणि फोटोग्राफीचे,,शिक्षण तो घेतो. 1911 साली लाइफ ऑफ ख्राईस्ट पाहिल्यावर निर्धन अवस्थेतही तो मुलगा 10 हजार रुपये कर्ज काढून लंडनला जातो.तेथून चित्रपट बनवण्याचे सर्व सामान विकत आणतो.स्वतःची फ्लिम कंपनी स्थापन करतो.आणि भारतातील पहिला मुकपट राजा हरिश्चंद्र हा चित्रपट तयार करतो.अशा प्रकारे भारतीय चित्रपट सृष्टीची मुहूर्तमेढ रोवणारा तो मुलगा म्हणजे धुंडिराज गोविंदराव फाळके उर्फ दादासाहेब फाळके*.
भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक म्हणून दादासाहेब फाळके यांना ओळखले जाते.त्यांच्या नावाने चित्रपट सृष्टीतील सर्वात मानाचा सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात येतो. 'रोपट्याची वाढ' या लघुपटापासून सुरू झालेला प्रवास मोहिनी, भस्मासुर, सत्यवान सावित्री,लंकादहन,यांसारख्या 47 चित्रपट तर 30 लघुपट त्यांनी तयार केले.'गंगावतरण ' हा त्यांनी निर्माण केलेला पहिला बोलपट होता.पाच मित्र बरोबर घेऊन 'हिंदुस्थान सिनेमा कंपनी ' स्थापन करून त्यांनी भारतीय चित्रपट व्यवसायाला सुवर्णकाळाचे दिवस आणले.
*दादासाहेब फाळके हे नाव भारतीय चित्रपट सृष्टीत मानाचे पान ठरले ही गोष्ट सर्व भारतीयांसाठी अभिमानास्पद अशीच म्हणावी लागेल.कॅमेरा,कच्ची फ्लिम,फ्लिम ला भोके पडण्याची मशीन,हे असे साहित्य या माणसाने कर्ज काढून दुसऱ्या देशातून आणले आणि भारतात चित्रपट सुरू झाले.हे सगळे करताना त्यांच्या कडे हा आत्मविश्वास होता की लोक हे सारे पहायला येतील आणि झालेही तसेच.लोकांच्या उड्या पडल्या.यावरून आपण एकच शिकायचे की एखादी नवीन कल्पना यशस्वी करायची असेल तर ते ध्येय ठरवा.ते ध्येय स्वप्न म्हणून जगा मग तुम्ही यशस्वी होताच होता*

Comments
Post a Comment