गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग ४४

 *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या*

*📝*भाग44-*

*📝*श्री.चंद्रकांत बोऱ्हाडे*

    8308677799

    8806150248                     *त्याचा जन्म सांगली येथे 11 जानेवारी 1898 साली झाला.वडील आत्माराम चांगल्या नोकरीला असल्याने घरात कशाची ददाद नव्हती.पण तो 13 वर्षाचा असताना त्याच्या वडिलांचे निधन होते.त्यात तो कोलमडून जातो कारण त्याला वडिलांचा फार लळा असतो.यात तो एकाकी पडतो.स्वतःचे रितेपण घालवायला तो लिहू लागतो.कागदावरील शब्द जणू त्याच्याशी बोलू लागतात.पुढे त्याला लिहण्याची इतकी आवड लागते की आपल्या लेखनाने तो अनेक निराश मनांना उभारी देतो. त्याच्या लेखनावर वाचक अफाट प्रेम करतात.याच लेखनाच्या जोरावर तो मुलगा साहित्यातील मानाचा  ज्ञानपीठ पुरस्कार मिळवतो.तो मुलगा म्हणजे महान लेखक  विष्णू सखाराम खांडेकर*.          


त्यांचा ययाती या कादंबरीचा ज्ञानपीठ पुरस्कार देऊन सन्मान केला गेला.साहित्य अकादमीचा पुरस्कार, पदमभूषण,कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाची डी लिट,1941 च्या सोलापूरच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष,भारत सरकारकडून त्यांच्या टपाल तिकिटाचे अनावरण यासारखे अनेक सन्मानाचे ते मानकरी ठरले.


गणेश आत्माराम *खांडेकर हे त्यांचे मूळ नाव होते. पण काका सखाराम यांना ते* *दत्तक दिले गेले आणि त्यांचे नाव विष्णु सखाराम खांडेकर झाले*.           *1928 साली खांडेकर यांचे संगीत रंकाचे राज्य पुस्तक प्रसिद्ध झाले.पुढे तो प्रवास इतका* *मोठा झाला की कांचनमृग,हिरवा चाफा,रिकामा देव्हारा,पांढरेढग,अश्रू,अमृतवेल ज्वाला दोन मने,अशा* *कथा,कादंबऱ्या,रूपककथा यांच्या रूपाने त्यांनी 70 पेक्षा अधिक पुस्तके  लिहली.ते सिंधुदुर्ग मधील शिरोडे या गावी शिक्षक होते.हजारो वाचकांना ज्ञानाची दृष्टी देणाऱ्या या महान लेखकाच्या वाट्याला आयुष्याच्या शेवटी अंधत्व आले ही एक शोकांतिकाच म्हणावी लागेल.लेखक सुखी होण्यासाठी लिहतो.पण तो काळ लेखकाच्या आयुष्यात कधीच येत नाही.जीवनातील गोष्टीवर शब्दबद्धता खुप आल्हाददायक असते.त्यांच्या जीवनाकडे पाहिले की वाटते,जीवन शेवरीच्या कापसासारखे मुलायम हवेत उडणारे असते.त्याला कुणालाही मुठीत बांधता येत नाही किंवा स्थायी ठेवता येत नाही*


Comments

Popular posts from this blog

राज्यातील स्वच्छ सुंदर शाळा धानोरे ,

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग १३४

गोष्ट माझ्या आईची भाग-२०