गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग ४२

 *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या*

*📝*भाग 42*

*📝*श्री.चंद्रकांत बोऱ्हाडे*

    8308677799

    8806150248


*इटली देशातील फ्लोरेन्स येथे तिचा जन्म 12 मे 1820 मध्ये एका सधन कुटूंबात झाला. लहानपणी तिला गणित प्रचंड आवडत असे.एकदा संख्या पाहिली की ती त्या संख्येला विसरत नसे.संख्याशास्रातील तज्ञ होती.पण आपला जन्म भूतदया आणि मानव सेवेसाठी झाला आहे असे तिला नेहमी वाटे.मग तीने रुग्ण सेवेला वाहून घेण्याचा निश्चय केला.हा निश्चय घरात बोलून दाखवला.घरातून सुरुवातीला खुप विरोध झाला.पण तिच्या हट्टापुढे आई वडील तयार झाले.ती परिचारिकेचे प्रशिक्षण घेते.लंडनच्या सैनिक रुग्णालयात   अधीक्षक बनते.साऱ्या जगाला परिचारिकांचे महत्त्व पटवून देणारी ती मुलगी म्हणजे जगातील पहिली परिचारिका फ्लोरेंस नाईटिंगेल*.                                   


जगातील पहिली परिचारिका असणाऱ्या फ्लोरेंस यांना रॉयल रेड कॉर्स पुरस्कार मिळाला.याशिवाय ऑर्डर ऑफ मेरिट हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या.त्या रुग्णसेवा करताना हातात कंदिल घेऊन फिरायच्या म्हणून जगात त्यांना 'लेडी विथ द लॅम्प 'ही उपाधी आहे.यामुळेच आजही परिचारिकांना रुग्णसेवेची शपथ घेताना हातात मेणबत्ती दिली जाते.  या शपथेला आजही 'नाईटिंगेल शपथ' म्हणतात.त्यांचा जन्मदिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो.                            


*त्यांनी संख्या शास्रातील ध्रुवीय क्षेत्र आकृती या स्वतःच्या शोधातून सैनिकांना मिळणाऱ्या अपुऱ्या सुविधांवर प्रकाश टाकला.त्यामुळेच जगात सैन्यात वैद्यकीय,स्वच्छता, विज्ञान, सांख्यिकी विभाग निर्माण झाले.महायुद्ध काळात केलेल्या रुग्णसेवेमुळे साऱ्या जगाला परिचारिकांचे महत्त्व समजले होते.याचे सारे श्रेय फ्लोरेंस यांनाच द्यावे लागेल.आजही कोरोना काळात परिचारिका रुग्णसेवेचा किती अविभाज्य भाग आहे हे आपल्याही लक्षात आले आहे.स्त्री कडे प्रेम ,करुणा,माया, जिव्हाळा हे सारे गुण जन्मजात ठासून भरलेले असतात.म्हणूनच ती रुग्ण बरा करण्यात मोलाचा वाटा उचलणारी उत्तम परिचारिका असते.नाईटिंगेल यांच्या जीवनाकडे पाहताना आपण एकच शिकायचे ध्येयावर अढळ श्रद्धा,कमालीची सेवाभावी वृत्ती,कार्यावर प्रचंड निष्ठा असेल तर यशाची खात्री कितीतरी पटीने वाढते*.


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

राज्यातील स्वच्छ सुंदर शाळा धानोरे ,

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग १३४

गोष्ट माझ्या आईची भाग-२०