गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग ४०
*📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या*
*📝*भाग40-*
*📝*श्री.चंद्रकांत बोऱ्हाडे*
8308677799
8806150248
*इटली देशातील बोलोग्रा या गावी त्याचा जन्म 25 एप्रिल 1874 साली झाला.वडील मोठे व्यापारी तर आई गृहिणी पण तिला संगीताची खुप आवड होती.जेथे कोपर्निकस ने पृथ्वी सूर्या भोवती फिरते हा शोध लावला ते बोलोग्रा हे गाव इटलीचे मुख्य शिक्षण केंद्र .येथेच त्या मुलाचे शिक्षण पूर्ण झाले.लहानपणापासून तो खट्याळ असला तरी त्याची बुद्धि व एकाग्रता वाखाण्याजोगी होती.शाळेत असल्यापासून पदार्थ विज्ञान व विद्युत शास्र हे त्याचे आवडीचे विषय होते.आपल्या मुलाची ही आवड पाहून त्याची आई त्याला त्यात संशोधन करायला पाठींबा देते.पुढे तो मुलगा आपल्या शोधाणे पृथ्वी आणि अंतराळ यांना जवळ आणतो. बिनतारी संदेशवहनाचा अविश्वसनीय शोध लावणारा तो मुलगा म्हणजे गुलीमो मार्कोनी*
मार्कोनी यांना त्यांच्या कार्याची दखल घेऊन पदार्थ विज्ञानाचा नोबेल पुरस्कार देण्यात आला., इटली सरकारचा नाईट पुरस्कार, मार्कवीस पुरस्कार,इटलीच्या सायन्स अकॅडमी चे अध्यक्ष यासारखे असंख्य सन्मान त्यांना प्राप्त झाले.
*मार्कोनी यांनी पहिला बिनतारी संदेश एक किलोमीटर वर पाठवला होता.नंतर इंग्लंड मधील मुख्य पोस्ट ऑफिस च्या छपरावरून त्यांनी आपले प्रात्यक्षिक यशस्वी केले.रेडिओच्या शोधाचे जनक असणारे मार्कोनी यांनी बिनतारी संदेशवहनात विद्युत चुंबकीय तत्वाचा वापर केला होता.आज असंख्य जहाजावर असणारी बिनतारी यंत्रणा असो किंवा अवकाशात यानाशी संपर्क असो रेडिओ लहरी असो ही सारी मार्कोनी नी जगाला दिलेले वरदानच आहे.टायटॉनिक जहाज जेव्हा बुडाले तेव्हा त्यावर ही बिनतारी संदेश यंत्रणा होती म्हणून संदेश जाऊन मदत मिळाली त्यामुळे 700 पेक्षा अधिक प्रवाशी वाचले होते*.
*जगातील सर्वात मोठे वायरलेस स्टेशन मार्कोनी यांनी उभारले.पहिल्या महायुद्धात जगासाठी ही यंत्रणा निरोप पोहोच करण्यासाठी वरदान ठरली.बिनतारी संदेशवहनाच्या बाबतीत कुठलीही पार्श्वभूमी नसताना मार्कोनी यांनी हे तंत्रज्ञान आपल्या सर्वांच्या आवाक्यात आणले.यावरून एकच शिकायचे तुमचा भूतकाळ काय आहे यापेक्षा तुम्ही वर्तमानकाळात विजयी होण्यासाठी प्रयत्नांची काय पराकाष्ठा करता यावरच तुमचा विजय निश्चित असतो.*

ĺj
ReplyDelete