गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग-१२
*📝गोष्टी जिद्दी माणसांच्या पर्व -2 नवीन गोष्टी नवीन व्यक्ती* *📝भाग -12-* *📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे* 8308677799 8806150249 *अमेरिका देशात 4 ऑगस्ट 1961 रोजी व्होनोलुल हवाई येथे त्याचा जन्म,वडील बराक ज्युनियर व आई एस.एन.डनहॅम यांच्या पोटी झाला. तो दहा वर्षांचा असताना आई वडिलांचा घटस्फोट होतो.आजी आजोबा त्याचा सांभाळ करतात.आई बाबा त्याला भेटायला येत असे पण ती भेट दुर्मिळच.त्याचे प्राथमिक शिक्षण इंडोनेशिया देशातील जकार्ता येथे होते.मग तो व्होनोलुल हवाई येथे येतो.कोलंबिया विद्यापीठात राजकरण शास्त्र,तर हार्वर्ड विद्यापीठात कायदा विभागात उच्च पदवी मिळवतो.पुढे तो मुलगा राजकारणात आपले नशीब अजमावतो.आपल्या अमोख वक्तृत्वाने लोकांच्या मनात घर करून बसतो.मग तो मागे वळून पाहत नाही.पुढे तो मुलगा जगातील सर्वात शक्तिशाली अमेरिका या देशाचा सलग आठ वर्ष पहिला आफ्रिकन कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष बनतो.तो मुलगा म्हणजे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष,नोबेल पारितोषिक विजेते बराक ओबामा*. *सलग 12 वर्ष शिकागो विद्यापीठात संविधानशास्त्र शिकव...