गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग 129


 *📝गोष्टी जिद्दी माणसांच्या** *पर्व -2*

 *नवीन गोष्टी नवीन व्यक्ती* 

*📝भाग -29-*

*📝*श्री.चंद्रकांत मारुती     बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे*

8308677799

8806150249



*त्याच्या जन्म जन्म २७ सप्टेंबर १९३२ रोजी,लाहोर पंजाब प्रांत येथे झाला.त्याचे वडील ब्रिटिश राजवटीत PWD विभागात लेखपाल म्हणून काम करत होते. आठ मुलांमध्ये तो सर्वात लहान होता.त्याचे शिक्षण जालंधर येथे झाले.त्याचे इंजिनियर होण्याचे स्वप्न होते,पण आयुष्यात घडले वेगळेच.फाळणीनंतर पूर्व पंजाब भारतात आल्यावर तो मोठ्या भावाबरोबर मायानगरी मुंबई येथे येतो.भावाबरोबर अगदी नवीन अशा चित्रपट दिग्दर्शन क्षेत्रात सुरुवातीला साहाय्यक दिग्दर्शक  म्हणून काम करतो.पुढे तो मुलगा स्वतःची चित्रपट निर्मितीची कंपनी काढतो.मग तो मुलगा चित्रपट क्षेत्रात इतका प्रसिद्ध दिग्दर्शक बनतो की त्याचे चित्रपट म्हणजे हमखास यश हे समीकरण दृढ होते.हजारो वितरक त्याच्या  चित्रपटाचे हक्क घेण्यासाठी धडपडत करू लागतात.हे सारे यश मिळवणारा तो मुलगा म्हणजे प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक यश चोप्रा आणि ती चित्रपट कंपनी म्हणजे निर्मिती आणि वितरण यशराज फिल्म कंपनी*. 


*यश चोप्रा यांना त्यांच्या चित्रपट कारकिर्दीत त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल अनेक सन्मान मिळाले.यात भारत सरकारचा पद्मभूषण,मानाचा दादासाहेब फाळके ,जीवन गौरव,दादाभाई नौरोजी मिलेनियम,8 फिल्मफेअर पुरस्कार,6 राष्ट्रीय उकृष्ट चित्रपट पुरस्कारांचे ते मानकरी ठरले.पंजाब व चंदीगड विद्यापीठात त्यांचा डॉक्टरेट देवून सन्मान केला गेला.ब्रिटिश अकादमी ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन आर्ट चे आजीवन सभासद असणारे ते एकमेव सदस्य* *होते.याशिवाय, त्यांच्या चित्रपटांनी अनेक पुरस्कार समारंभांमध्ये उत्कृष्टता मिळवली ज्यामुळे त्यांच्या कलेची आणि योगदानाची वेगळी ओळख झाली*.


*भारतीय चित्रपटसृष्टीतील एक वेगळे नाव म्हणजे यश चोप्रा.अमिताभ बच्चन यांना घेवून त्यांनी तयार केलेला 'दीवार'चित्रपट इतका गाजला की बच्चन रातोरात सुपरस्टार अँग्री यंग मॅन झाले.त्यांनी आपल्या कारिर्दीतीत दीवार,कभी कभी, चांदनी,दिल तो पागल है,दिलवाले दुल्हनिया* *ले जाएंगे,वीर-ज़ारा,डर,सिलसिला, कभी अलविदा ना कहना,मोहब्बते,धडकन*, *सूर्यवंशम यासारखे अनेक अजरामर चित्रपट निर्माण केले, ज्यात प्रेम आणि भावनांचा अनोखा स्पर्श होता. त्यांचा प्रवास सुरुवातीपासूनच सोपा नव्हता; मात्र त्यांनी प्रत्येक अडचणींचा सामना जिद्दीने केला*.

*त्यांच्या यशाची एक महत्त्वाची बाब म्हणजे त्यांनी नेहमी नवीन प्रयोग केले.आपल्या चित्रपटांच्या* *माध्यमातून त्यांनी भारतीय सिनेमा मध्ये एक वेगळी शैली निर्माण केली. त्यांच्या चित्रपटांमध्ये संगीत,कथा आणि दृश्ये यांचा समन्वय असा अनोखा अनुभव येत असे*.


*त्यांच्या चित्रपटांमध्ये प्रेमाची जिद्द आणि संघर्षाची कहाणी नेहमीच ठळकपणे दिसून येते.प्रेमाचे कारण देवून त्यांनी चित्रपटाला सामान्य माणसाच्या जीवनाशी* *जोडले.दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे हा चित्रपट अनेक वेळा पाहणारे प्रेक्षक त्यामुळेच लाभले.अमिताभ बच्चन,ऋषी कपूर,हेमा मालिनी,अनुपम खेर,शशी कपूर,जुही चावला,शाहरुख खान,अरुणा इराणी यासारख्या अनेक दिग्गज कलाकारांनी त्यांच्या बरोबर काम केले.अवघे काही रुपये खिशात असताना मुंबई येथे आलेले यश चोप्रा त्यांच्या कामावर असलेली त्याची निष्ठा यामुळेच इतके यशस्वी झाले. त्यांचे आयुष्य आपल्याला हाच संदेश देते की"यशस्वी* *होण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा स्वतःवर विश्वास ठेवावा लागतो*."

*संकटे म्हणजे संधींची पहिली पायरी असतात.एक पायरी चढले की* *पुढील हजारो पायऱ्या तुम्हाला अथक मेहनतीने यशाकडे घेवून जातात*.

Comments

Popular posts from this blog

राज्यातील स्वच्छ सुंदर शाळा धानोरे ,

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग १३४

गोष्ट माझ्या आईची भाग-२०