गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग , 128

 

*📝गोष्टी जिद्दी माणसांच्या** *पर्व -2*

 *नवीन गोष्टी नवीन व्यक्ती* 

*📝भाग -28-*

*📝*श्री.चंद्रकांत मारुती     बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे*

8308677799

8806150249


*तिचा जन्म अमेरिकेतील अलाबामा येथील टास्कमबिया येथे 27 जून 1980 रोजी आई व्हेलेरियान वडील आर्थर यांच्या पोटी झाला.तिच्या जन्मानंतर सगळे काही सुरळीत सुरू होते.पण ती दोन वर्षाची असताना पोट आणि मेंदूचा तीव्र रक्तसंचय असणारा आजार होतो.आई वडील यावर उपचार पद्धती अस्तित्वात असेल म्हणून धावाधाव करतात पण हाती काहीच लागत नाही.या आजारातून ती मुलगी बरी होत नाही.तिला इतक्या लहान वयात कायमचे बहिरेपणा आणि आंधळेपण येते.ती मुलगी हळूहळू मोठी होते.प्रचंड जिद्दीने अंधांच्या सर्व भाषा शिकते.अंध असूनही अनेक पुस्तकांचे लेखन करते.जागतिक पातळीवर अपंगत्व हकक वकील म्हणून काम करते इतकेच नाही तर पदवी मिळवणारी पहिली अंध,मूकबधिर विद्यार्थी म्हणून मान मिळवते.ती मुलगी म्हणजे अंध लोकांच्या आयुष्याचा दीपस्तंभ बनलेली हेलेन केलर*


*अंधत्व व बधीरपणावर उपचार न मिळालेल्या हेलेन यांना अँनि सुलीवन नावाच्या शिक्षिका मिळाल्या आणि त्यांच्या आयुष्याचे सोने झाले.सुलीवन यांनी हेलेन यांना अगदी तंतोतंत आणि दयाळूपणे समजून घेवून शिकवले.अक्षरे आणि शब्द शिकवण्यासाठी खूप मेहनत घेतली.त्यानंतर हेलेन यांच्या शिक्षणाची सुरुवात झाली.1904 मध्ये उच्च शिक्षण संपवणारी हेलेन ही पहिली अंध,बधीर व्यक्ती होती.त्यांचे the story of my life हे आत्मचरित्र प्रचंड गाजले. माय रीलिजन, ओपन डोअर यासारखी 14 पुस्तके त्यांनी लिहिली.प्रेसिडेशियल मेडल ऑफ फ्रीडम हा अमेरिकेचा उच्च सन्मान त्यांना प्रदान करण्यात आला*.


*अंध आणि बधीर लोकांच्या हक्कासाठी कार्य करताना त्यांनी विविध चळवळीत भाग घेतला,.या लोकांच्या समस्यांवर आपल्या हजारो व्याख्यानातून प्रकाश टाकला त्याबद्दल जागरूकता वाढविण्यासाठी कार्य केले.यावर विषयावर अनेक ठिकाणी सार्वजनिक भाषणे दिली.हेलेन यांचे जन्म ठिकाण नॅशनल हिस्टोरिक लॅन्डमार्क म्हणून संरक्षित केले आहे त्यावरून त्यांनी अंध व बधीर लोकांसाठी केलेल्या कार्याचा महती लक्षात येते.20 व्या शतकातील मोस्ट वाइडली ॲडमायर्ड पीपल्स मध्ये समावेश असणाऱ्या एकमेव महिला असणाऱ्या हेलेन यांना अजाणत्या वयात जन्मानंतर मिळालेले अकाली अपंगत्व  जाणत्या वयात आपले शक्तिस्थान बनवले आणि त्या आयुष्यात यशस्वी झाल्या.हेलेन यांचे आयुष्य आपल्याला हाच संदेश देते की आपल्याला मिळालेल्या धडधाकट आयुष्याबद्दल अजिबात कुरकुर न करता प्रत्येकाने आपापल्या परीने त्या त्या काळात ज्याच्या त्याच्या क्षेत्रात आपल्या कार्याचा दीपस्तंभ बनून इतरांना दिशादर्शक ठरावे*.

Comments

Popular posts from this blog

राज्यातील स्वच्छ सुंदर शाळा धानोरे ,

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग १३४

गोष्ट माझ्या आईची भाग-२०